महाराष्ट्र

बारामतीत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रम

बारामतीत श्रवणयंत्र वाटप कार्यक्रम लक्ष केंद्रीत केले तर प्रश्न दूर होतात

मिलिंद संगई : शनिवार, 11 ऑगस्ट 2018 Hearing Aid Distribution Program In Baramatiबारामती - कोणत्या गोष्टीचा संबंध नेमका कशाशी असेल याची पुसटशीही कल्पना अनेकदा आपल्याला नसते, मात्र या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले तर अनेक प्रश्न चुटकीसरशी दूर होतात ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांच्या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमातून गेल्या चार वर्षात सिध्द झाली आहे.ज्येष्ठ नागरिक वयोमानापरत्वे कानाने नीट ऐकू शकत नाहीत. ऐकूच येत नाही म्हटल की कुटुंब आणि समाजही अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करु लागतात, त्या व्यक्तीचा इतरांशी संवाद खुंटल्याप्रमाणे होतो आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मन व शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेकदा या छोट्याशा गोष्टीमुळे कौटुंबिक कलह वाढतात आणि त्याचा परिणाम मने दुभंगण्यावरही दिसतो. या ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र दिले तर या सर्वच समस्या दूर होतील आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील, ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सुप्रिया सुळे यांनी अमेरिकास्थित स्टार्की फाऊंडेशनचे बिल अँस्टिन व टॅनी अँस्टिन या दांपत्यांला श्रवणयंत्र देण्याची विनंती केली. सामाजिक भान असलेल्या या दांपत्यांने गेल्या चार वर्षात प्रत्येकी 25 हजार रुपये किंमतीची जवळपास 15 हजार श्रवणयंत्रे बारामती लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक व बालकांना विनामूल्य देऊ केली आहेत.दरवर्षी हे दांपत्य अमेरिकेतून स्वखर्चाने संपूर्ण टीमसह भारतात येऊन नागरिकांना हे यंत्र बसविण्याचे काम करीत आहे. त्यांच्याकडून दिले जाणारे श्रवणयंत्र अमेरिकन बनावटीचे असून त्याचा मोल्ड हा डेन्मार्कचा आहे. अत्यंत उत्तम दर्जाची अशी ही श्रवणयंत्रे व पूरक साहित्य आहे.प्रतिवर्षी पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व दुस-या टप्प्यात बालके अशा नावनोंदणी होणा-या प्रत्येकाला विनामूल्य दोन्ही कानांची श्रवणयंत्रे व पूरक साहित्यही दिले जाते. स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व मुंबईस्थित एसआरव्ही ट्रस्ट व ठाकरसी समूह आणि पुणे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या मदतीने हा उपक्रम गेली चार वर्षे सातत्याने राबविला जात आहे.या उपक्रमाचे वैशिष्टय म्हणजे आजवर श्रवणयंत्र बसविलेल्या प्रत्येक रुग्णाची नियमित तपासणी केली जाते, केवळ यंत्र बसवून हा कार्यक्रम संपत नाही तर नियमित तपासणी केल्यामुळे काही जणांच्या अडचणी असतील तर त्याही सोडविल्या जातात. ग्रामीण भागात श्रवणयंत्र लावून समाजात वावरण्याची अनेकांना लाज वाटत असे, आता मात्र ऐकायला छान येत आहे हे लक्षात आल्याने लोक उत्स्फूर्तपणे नावनोंदणी करतात, त्याचा फायदाही त्यांना होतो.ऐकायला कमी आल्याने मनात एकटेपणाची भावना निर्माण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र बसविल्यानंतर जेव्हा पहिला आवाज ऐकू येतो, तेव्हा त्यांच्या चेह-यावर जो आनंद असतो, तो खरच शब्दातीत असतो अशी भावना या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कार्यरत अनेकांनी बोलून दाखविली. निरपेक्षपणे आजी आजोबांच्या सेवेसाठी अनेक स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होतात.कोणीही वंचित राहू नये....ऐकता येत नाही म्हणून एकही ज्येष्ठ नागरिक किंवा बालक समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडू नये हीच सुप्रिया सुळे यांची प्रामाणिक इच्छा आहे. आजी आजोबांमुळे कुटुंबात आनंद फुलावा आणि त्यांच्या जीवनाची संध्याकाळही हसतखेळत व्यतित व्हावी हाच या उपक्रमामागे त्यांचा हेतू आहे.श्रवणयंत्रासाठी तपासणीच्या आगामी तारखा पुढील प्रमाणे आहेत - सिंहगड रोड, पुणे- 16 ऑगस्ट, मुळशी उपजिल्हा रुग्णालय- 17 ऑगस्ट, भोर उपजिल्हा रुग्णालय- 18, पुरंदर-संभाजी सभागृह, सासवड, 19, बारामती- राष्ट्रवादी भवन, कसबा, -20, इंदापूर- 21 ऑगस्ट. या बाबत अधिक माहितीसाठी 020-24264253 किंवा 24263266 व दीपाली पवार बारामती 9960728400 या क्रमांकावर संपर्क साधावा.http://www.esakal.com/pune/hearing-aid-distribution-program-baramati-137112

Read More
  580 Hits

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी : पोलीस केस

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंची बदनामी

August 13, 2018 टीम थोडक्यात Top News 0 ‘हाताची घडी’वर पोलीस केस मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या पेजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या पेजच्या माध्यमातून शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेत ही तक्रार करण्यात आली आहे. ‘हाताची घडी, तोंडवर बोट’च्या माध्यमातून आमची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. आक्षेपार्ह मजकूर डिलीट व्हावा, तसेच हे पेज कायमचं बंद केलं जावं, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. https://www.thodkyaat.com/hatachi-ghadi-tondavar-boat-case-register/

Read More
  501 Hits

पुणे : राष्ट्रवादी नेत्यांवर सोशल मीडियात शेरेबाजीला आळा घाला : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी नेत्यांवर सोशल मीडियात शेरेबाजीला आळा घाला : सुप्रिया सुळे

https://www.facebook.com/abpmajha/videos/746740425496656/

Read More
  502 Hits

महिलांसाठी धावून आल्या सुप्रियाताई

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजदूर टाकणा-यांवर कारवाईची मागणी.. https://www.youtube.com/watch?v=JdQr_VG7hUg&feature=youtu.be

Read More
  512 Hits

मतं विकायला निघालेल्या जनतेची सुप्रिया सुळे घेणार दखल

मतं विकायला निघालेल्या जनतेची सुप्रिया सुळे घेणार दखल

https://www.facebook.com/Tv9Marathi/videos/687576871593755/

Read More
  529 Hits

खा. सुप्रिया सुळेंची पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार

खा. सुप्रिया सुळेंची पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार

Byप्रभात वृत्तसेवा  August 13, 2018 | 3:40 pm हाताची घडी, तोंडावर बोटवर गुन्हा दाखल करण्याची मागणीसोशल मिडियावरून बदनामी : खा. सुप्रिया सुळेंची पोलिस आयुक्‍तांकडे तक्रारहाताची घडी, तोंडावर बोटवर गुन्हा दाखल करण्याची मागणीपुणे, दि. 13 – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मिडीयावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आज पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. मागील काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दात बदनामी केली जात आहे. त्या छायाचित्रासहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची आज सकाळी भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह स्वत: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे. राजकीय विरोधातून टीका करण्यास काहीही हरकत नाही; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्द वापरले जात आहेत. मजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे प्रकार केले जात आहेत. फेसबुकवर हाताची घडी, तोंडावर बोट नावाचे एक पेज आहे. या पेजवरून ही बदनामी केली जात आहे. त्यामुळे हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्याचे ऍडमिन जे कोणी असतील त्या सर्वांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.आमच्या नेत्यांनी अथवा मी कधीही कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील जनतेमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. त्यासाठी फोटो मॉर्फ केले जात आहेत. या प्रकारामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षातील मान्यवर नेते आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांना याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF/

Read More
  522 Hits

सोशल मिडियावरील बदनामी प्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

सोशल मिडियावरील बदनामी प्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार ‘हाताची घडी. तोंडावर बोट’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सरकारनामा ब्युरो : सोमवार, 13 ऑगस्ट 2018‘हाताची घडी. तोंडावर बोट’वर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मिडीयावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आज पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. गेल्या काही दिवसांपासून ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दात बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची आज सकाळी भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली. राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह स्वत: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आयुक्तांना सांगितले. ''राजकीय विरोधातून टीका करण्यास काहीही हरकत नाही; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्द वापरले जात आहेत. मजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे प्रकार केले जात आहेत. फेसबुकवर ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ नावाचे एक पेज आहे. या पेजवरून ही बदनामी केली जात आहे. त्यामुळे हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्याचे अॅडमिन जे कोणी असतील त्या सर्वांवर ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी,'' अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ''आमच्या नेत्यांनी अथवा मी कधीही कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील जनतेमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. त्यासाठी फोटो मॉर्फ केले जात आहेत. या प्रकारामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षातील मान्यवर नेते आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांना याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी,'' अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.http://www.sarkarnama.in/supriya-sule-met-pune-cp-lodge-complaint-defamation-27381

Read More
  614 Hits

सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची तक्रार

सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची तक्रार कठोर कारवाईची सुप्रिया सुळेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत ऑनलाइन लोकमत गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. पुणे :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेआणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची सोमवारी सकाळी भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली. राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह स्वत: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली जात आहे. राजकीय विरोधातून टीका करण्यास काहीही हरकत नाही; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्द वापरले जात आहेत. मजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे प्रकार केले जात आहेत. फेसबुकवर हाताची घडी, तोंडावर बोट नावाचे एक पेज आहे. या पेजवरून ही बदनामी केली जात आहे. त्यामुळे हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्याचे अ‍ॅडमिन जे कोणी असतील त्या सर्वांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.आमच्या नेत्यांनी अथवा मी कधीही कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील जनतेमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. त्यासाठी फोटो मॉर्फ केले जात आहेत. या प्रकारामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षातील मान्यवर नेते आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांना याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. http://www.lokmat.com/pune/supriya-sule-complaint-police-commissioner-defamation-social-media/

Read More
  530 Hits

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे.

सकाळ वृत्तसेवा सोशल मीडियावर बदनामीपुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एका फेसबुक पेजवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुप्रिया सुळे यांची बदनामी करणारा मजकूर टाकला जात आहे. याबाबत सुळे यांनी सोमवारी डॉ. व्यंकटेशम यांची भेट घेतली. पक्षाध्यक्षांसह वरिष्ठ नेत्यांवर राजकीय विरोधातून टीका जरूर करावी; मात्र त्यांच्याबाबत फेसबुक पेजवर वैयक्तिक पातळीवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केली जात आहे. मजकुरामध्ये बदल करण्यापासून ते छायाचित्रांमध्येही फेरबदल केले जात आहेत. त्यामुळे संबंधित फेसबुक पेज चालविणाऱ्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी सुळे यांनी केली.पक्षनेत्यांनी किंवा मी स्वतः कधीही, कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती जाणीवपूर्वक सगळीकडे पसरविली जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज पसरत आहे. परिणामी आमच्या प्रतिमेचे हनन होत असून, हा प्रकार गंभीर आहे.- सुप्रिया सुळे, खासदारhttp://www.esakal.com/pune/ncp-senior-leader-slander-social-media-supriya-sule-137581

Read More
  546 Hits

कोल्हापूर लोहमार्गावरील ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वेस्थानकाचे भाग्य उजळणार.

https://www.youtube.com/watch?v=WNMR7JAA8oA&feature=youtu.be

Read More
  596 Hits

जेजुरी -तीर्थक्षेत्र जेजुरीचे रेल्वेस्थानक होणार आता चकाचक

https://www.youtube.com/watch?v=HD5Sg2k-vwk&feature=youtu.be

Read More
  529 Hits

फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दात बदनामी

RBM INFOMEDIA 13-August-2018 सुप्रिया सुळेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मिडीयावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आज पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. गेल्या काही दिवसांपासून ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दात बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.  पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची आज सकाळी भेट घेऊन सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार केली. राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह स्वत: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीका केली जात आहे. राजकीय विरोधातून टीका करण्यास काहीही हरकत नाही; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामीकारक शब्द वापरले जात आहेत. मजकुरात बदल करणे, फोटो मॉर्फिंग करणे असे प्रकार केले जात आहेत. फेसबुकवर ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ नावाचे एक पेज आहे. या पेजवरून ही बदनामी केली जात आहे. त्यामुळे हे पेज चालविणारे, त्यावर मजकूर टाकणारे आणि त्याचे ऍडमिन जे कोणी असतील त्या सर्वांवर ‘माहिती तंत्रज्ञान कायद्या’नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आमच्या नेत्यांनी अथवा मी कधीही कुठेही न बोललेली विधाने तयार करून ती आमचीच आहेत, असे भासवत राज्यातील आणि देशभरातील जनतेमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. त्यासाठी फोटो मॉर्फ केले जात आहेत. या प्रकारामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष, पक्षातील मान्यवर नेते आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा गंभीर गुन्हा असून संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांना याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. http://aplapune.com/#/news/4243/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0

Read More
  582 Hits

संविधान ही भारतीयांची ओळख : खासदार सुप्रिया सुळे

संविधान ही भारतीयांची ओळख : खासदार सुप्रिया सुळे 'मेरा संविधान मेरा अभिमान'

संविधान प्रोटेस्ट ऑफ फेसबुकर्सच्या माध्यमातून 'मेरा संविधान मेरा अभिमान' या निषेधपर कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन केले होते. लोकसत्ता ऑनलाइन | August 13, 2018 मेरा संविधान मेरा अभिमान' संविधान ही भारतीयांची ओळख असून संविधानाच्या विरोधात जर चुकीचे काम होत असल्यास पंतप्रधानांनी त्याच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत पोलीस यंत्रणेने त्यांना शिक्षा दिल्यास पुन्हा एकदा देशात संविधान जाळण्याचा कोणी विचारही करणार नाही, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले. दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर काही व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यावर त्या घटनेचा निषेध देशभरातून करण्यात येत आहे. पुण्यातील फर्ग्यूसन महाविद्यालय रस्त्यावर तरुणांनी एकत्र येत संविधान प्रोटेस्ट ऑफ फेसबुकर्सच्या माध्यमातून ‘मेरा संविधान मेरा अभिमान’ या निषेधपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिंदाबाद, जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान के सन्मानमे हम उतरे मैदान मे, इन्क्लाब इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

Read More
  541 Hits

फेसबुक पेजवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; ॲडमिनवर कारवाई करा : सुप्रिया सुळे

फेसबुक पेजवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी; ॲडमिनवर कारवाई करा : सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंची पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे तक्रार

Published On: Aug 13 2018 प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सोशल मीडीयावरुन बदनामी होत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या संदर्भात सोमवारी सकाळी थेट पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडे तक्रार केली आहे. या संदर्भातील पुरावे त्यांनी आयुक्तांकडे दिले आहेत. फेसबुकवर हाताची घडी, तोंडावर बोट नावाचे पेज तयार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांवर खालच्या शब्दात टीका केली जात आहे. राजकीय विचारधारेतील विरोधातून टीका करण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र वैयक्तिक पातळीवरील बदनामीकारक टीका केली जात आहे. खोटी विधाने तयार करुन, खोटे फोटो तयार करुन संभ्रम निर्माण केला जात आहे. अशा खोट्या पोस्ट तयार करुन पक्षातील मान्यवर नेते शरद पवार आणि माझी बदनामी केली जात आहे. यामुळे आमच्या प्रतिमेचे हनन होत आहे. हा प्रकार गंभीर असून त्याची दखल घेत या पेजच्या अ‍ॅडमिनवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांनी याबाबत माहिती देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. http://www.pudhari.news/news/Pune/NCP-leaders-defame-trough-Facebook-page-supriya-sule-demanded-action-on-Facebook-page-admin/

Read More
  538 Hits

संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर

संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर तरुणाईला पाठींबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित

ऑनलाइन लोकमत  | Follow  | Published: August 13, 2018 संविधानाच्या सन्मानासाठी पुण्यात तरुणाई रस्त्यावर दिल्लीत संविधानाची प्रत जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात तरुणाईने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. पुणे : दिल्लीत काही समाजकंटकांकडून संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील गुडलक चाैकात तरुणाई रस्त्यावर उतरली. फेसबुकवरील तरुणाईने स्थापन केलेल्या एका ग्रुपने संध्याकाळी संविधानाची प्रस्तावना अाणि भारतीय झेंडे हातात धरत निदर्शने केली. या तरुणाईला पाठींबा देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, पत्रकार संजय अावटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे अादी उपस्थित हाेते. यावेळी संविधानचा जयजयकार करणाऱ्या घाेषणा देण्यात अाल्या. तसेच संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव घाेषनेरुपी करुन देण्यात अाली. शेकडाे तरुण गुडलक चाैकात जमा झाले हाेते. पाेलिसांचा माेठा पाेलीस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. 'संविधान के सन्मान मै, हम उतरे मैदान मै' अशा घाेषणा यावेळी देण्यात अाल्या. तरुणाईने हातात संविधानाच्या प्रस्तवानेची प्रत तसेच भारताचा झेंडा घेतला हाेता. तसेच 'मेरा संविधान मेरा अभिमान' असे लिहीलेले अनेक फलकही हातात धरण्यात अाले हाेते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिल्लीतल्या दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी अाम्ही सर्व भारतीय अाज पुण्यात जमलाे अाहाेत. दिल्लीतील घटनेचा जाहीर निषेध अाम्ही करत अाहाेत. संविधान जाळणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाई करावी. पुन्हा देशात काेणी संविधान जाळण्याचा विचार करणार नाही अशी भीती घालायला हवी. संविधान अाम्हा भारतीयांची अाेळख अाहे अाणि त्यावर काेणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर अाम्ही त्याचा शांततेच्या मार्गाने निषेध करु. 21 व्या शतकात संविधान वाचवण्यासाठी अापल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय हे समाज म्हणून अपयश अाहे. अांबेडकरांनी पुराेगामी विचारांनी हे संविधान लिहीलं अाहे. ज्याची जगात प्रशांसा हाेत अाहे. असं संविधान जाळलं जात असताना त्यावर कुठलिच प्रतिक्रीया उमटत नाही, हे दुर्दैवी अाहे. भारताच्या रस्त्यारस्त्यावर लाेकांनीशांततेच्या मार्गाने या घटनेचा निषेध करण्यासाठी उतरायला हवं हाेतं. संविधान जाळल्याचा पहिला निषेध पंतप्रधानांनी दिल्लीत करायला हवा हाेता. संविधान वाचवण्याचं अांदाेलन हे कुठल्या पक्षाचं नाही तर विचार वाचवण्याचं अांदाेलन अाहे. http://www.lokmat.com/pune/honor-constitution-youths-road-pune/

Read More
  510 Hits

सुप्रिया सुळे यांची तक्रार

सुप्रिया सुळे यांची तक्रार जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम

Maharashtra Times | सुप्रिया सुळे यांची तक्रार म. टा. प्रतिनिधी, पुणे 'हाताची घडी तोंडावर बोट' या फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बदनामी केली जात असल्याची तक्रार खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन केली. 'या फेसबुक पेजवरून अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली जात आहे; तसेच वैयक्तिक पातळीवर जाऊन बदनामी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अथवा मी कधीही, कुठेही न बोललेली विधाने तयार करून, मजकूर बदलून, फोटो मार्फिंग करून ती विधाने आमचीच आहेत, असे भासविले जात आहे. त्याद्वारे जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम सुरू आहे,' असे सुळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Read More
  535 Hits

दोन महिन्यांच्या अथर्वसाठी सुप्रियाताई ठरल्या देवदूत

दोन महिन्यांच्या अथर्वसाठी सुप्रियाताई ठरल्या देवदूत ताईंच्या पाठपुराव्यामुळे अथर्वला जीवनदान

मिलिंद संगई : 09.37 AM सुप्रियाताई ठरल्या देवदूतबारामती शहर - नशीबाची दोरी बळकट असेल तर अनेकदा काही व्यक्ती देवदूतासारख्या धावून येत जीवदान देतात. असाच काहीसा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील पाटील कुटुंबियांना आला. खासदार सुप्रिया सुळे या वेळेस एखाद्या देवदूताप्रमाणे मदतीला धावून आल्या आणि पाटील कुटुंबियातील अवघ्या दोन महिन्यांचा अथर्व अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला.अथर्वचा जन्म झाल्यानंतर त्याच्या शरीरात अशुध्द रक्ताचा पुरवठा होत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. हृदयात गुंतागुंत निर्माण झाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते. इतक्या छोट्या बाळावर शस्त्रक्रीया करणे जोखमीचे काम असल्याने त्याला दहा लाखांवर खर्च येणार असे पाटील कुटुंबियांना सांगितले गेले.इतका मोठा खर्च करणे पाटील कुटुंबियांना अवघड होते, त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची त्यांचे स्वीय सहायक नितिन सातव यांच्या मदतीने भेट घेतली. सुप्रिया ताईंनी क्षणाचाही विलंब न लावता मुंबईच्या एस.एल. रहेजा असोसिएटच्या रुग्णालयास फोन लावला. ताईंचे समन्वयक डॉ. संतोष भोसले यांनी या बाबत त्वरेने पुढील कार्यवाही केली. ताईंचा फोन गेल्यानंतर रुग्णालयाची सूत्रे भराभर हलली व अथर्व याच्यावर ही अवघड शस्त्रक्रीया विनामूल्य तर झालीच पण नंतरची देखभाल व औषधेही निशुल्क मिळाली. दहा दिवसानंतर अथर्व याला बारामतीत आणले गेले आहे. सध्या अथर्व याची तब्येत उत्तम असून बारामतीचे डॉ. राजेंद्र मुथा यांच्या निरिक्षणाखाली तो आहे.ताई याच अथर्वसाठी देवदूतअथर्वचे प्राण वाचविण्यासाठी सुप्रियाताई अक्षरशः एखाद्या देवदूताप्रमाणे धावून आल्या, त्यांनी पाठपुरावा केला नसता तर अथर्वचे काय झाले असते माहिती नाही, अशी भावनिक प्रतिक्रीया पाटील कुटुंबियांनी व्यक्त केली.http://www.esakal.com/pune/two-months-atherva-survived-137874

Read More
  538 Hits

पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे

पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. Perform Puja At Your Home Supriya Suleलोकसत्ता ऑनलाइन | August 24, 2018 07:51 pmमहाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरुन झालेल्या वादावर बोलताना त्यांनी हे विधान केले.पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्यांबाबत आज पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.राज्यात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवरील प्रश्नांकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांनी पक्षाच्या प्रचाराकड़े कमी लक्ष द्यावे आणि महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे तसेच त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने त्यांना जर ते जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.फर्ग्युसन कॉलेजमधल्या सत्यनारायणाच्या पूजेवरून वादपुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावणमासानिमित सत्यनारायण पूजा करण्यात आली. या पूजेवरून वाद झाला. काही विद्यार्थी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात तणावाचे वातवारण निर्माण झाले होते.फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्यांच्या कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. याच कार्यालयाबाहेर असणाऱ्या फलकावर सर्व विद्यार्थ्यांनी पूजेचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. या पूजेची माहिती विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी प्राचार्यांना घेराव घालत जाब विचारला. मागील अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्यनारायणाची पूजेचे आयोजन केले जात असल्याने या वर्षीही पूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. पूजेचे आयोजन करुन आम्ही अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा पाळल्याचे स्पष्टीकरण या वादावर त्यांनी दिले.https://www.loksatta.com/maharashtra-news/perform-puja-at-your-home-supriya-sule-1737894/

Read More
  570 Hits

सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन सरकारला खडबडून जागे करण्यासाठी आंदोलन

सरकारनामा ब्यूरो : बुधवार, 29 ऑगस्ट 2018पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या बांधकाम खात्याला लक्ष्य केले असून, सेल्फी विथ खड्डा आंदोलन सुरू केले आहे. सरकारला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.सरकारने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रोज नवनव्या डेडलाईन देत  ‘तारीख पे तारीख’ हा खेळ सुरु ठेवला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्यभर मोहीम त्यांनी सुरु  केली आहे. गेल्या वर्षी या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.``राज्य प्रगतीच्या मार्गावरुन चालत असल्याच्या प्रचार सरकार एकीकडे करीत आहे. दुसरीकडे परिस्थिती मात्र त्याच्या विपरीत आहे. प्रगतीचा मार्ग तर सोडाच परंतु ज्या रस्त्यावरुन राज्यातील जनता रोज ये-जा करते ते रस्ते देखील धड नाहीत. ज्या शहरांना स्मार्ट करण्याचे ढोल या सरकारने पिटले त्या शहरांमध्येही हिच स्थिती आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांतील रस्त्यांची स्थिती विदारक आहे. याखेरीज राज्यांतील इतर शहरांना जोडणाऱ्या तसेच खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचीही दारुण अवस्था झाली आहे,`` असा आरोप त्यांनी केला.``या रस्त्यांची डागड्डुजी व्हावी, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आपण सर्वांनी या पूर्वी ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन पुकारत यापूर्वीही सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता.आता परत तुम्ही तुमच्या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत फोटो काढून तो फेसबुक, ट्विटर या सोशल मिडियावर अपलोड करायचा आहे. या फोटोसोबत #SelfieWithPotholes हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन सुळे यांनी केले आहे.http://www.sarkarnama.in/mp-supriya-sule-selfie-potholes-27988

Read More
  620 Hits

‘सनातन’वरुन लक्ष विचलित करण्यासाठी विचारवंतांना अटक: सुप्रिया सुळे

‘सनातन’वरुन लक्ष विचलित करण्यासाठी विचारवंतांना अटक: सुप्रिया सुळे राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले

कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, सुप्रीम कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी मी कोर्टाचे आभार मानते-सुप्रिया सुळे ‘सनातन’ या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेवरील कारवाईवरुन लक्ष विचलित करण्यासाठी डाव्या विचारधारेच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, असा सवालही त्यांनी विचारला. पुणे पोलिसांनी नक्षली समर्थक असल्याच्या संशयातून देशाच्या विविध भागांमधून पाच जणांना नुकतीच अटक केली होती. या अटकेवरुन सुप्रीम कोर्टाने पोलिसांना फटकारले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुण्यात भाजपा सरकारवर टीका केली. ‘सनातन’वरच लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्या विचारांच्या विचारवंतांना अटक करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. कुठली पुस्तक वाचायची हे पण सरकारने ठरवायचे का?, सुप्रीम कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारला विचारवंतांच्या अटकेवरून फटकारले यासाठी मी कोर्टाचे आभार मानते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुण्याजवळील बोपदेव घाटात खड्डयासोबत सेल्फी घेतला. राज्यातील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डा नाही. वाढते अपघात, त्यामुळे हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण? पारदर्शक कारभाराचे दावे करणाऱ्या या सरकारला रस्त्यांची दुरावस्था दाखवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Read More
  522 Hits