माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बंधू आणि भगिनींनो,
सप्रेम नमस्कार,

राजमाता माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, राजे उमाजी नाईक या महान विभूतींच्या कृतीशील विचारांचा वारसा कायम माझ्या डोळ्यांसमोर असतो. हा वारसाच जनतेसाठी काम करण्याची माझी ऊर्जा आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वस्तुपाठ आपल्या अनुयायांना घालून दिला. आदरणीय पवार साहेबांनी आयुष्यभर याच मार्गावर वाटचाल केली व करत आहेत. साहेबांच्या विचारांचा हाच वसा आणि वारसा कायम राखण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. हा वैचारीक मार्ग प्रगतीकडे घेऊन जाणारा, स्वाभिमानाची आणि नीतीमत्तेची जपणूक करणारा आहे. मतदार बंधू आणि भगिनींनो,आपण गेली तीन टर्म आपली लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर प्रचंड विश्वास टाकून लोकसभेवर निवडून पाठविले. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी सदैव प्रांजळपणे प्रयत्न करीत आहे. गेल्या तीनही कार्यकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि त्यांच्या हिताचे संवर्धन करणारे मुद्दे मी आवर्जून संसदेत उपस्थित केले. महाराष्ट्रातील मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम यांसह विविध समाजांना आरक्षण मिळावे, यासोबतच इतर समाजांच्या हक्कांचेही सरंक्षण व्हावे हा विचार मी सातत्याने संसदेत आग्रहाने मांडला. शेती, महिला सुरक्षा, सामाजिक न्याय, महागाई, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सर्व मुद्दे आग्रहाने संसदेच्या पटलावर मांडून त्यावर केंद्र सरकारने मार्ग काढून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. संसदेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, मांडले जाणारे प्रश्न, खासगी विधेयके, महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चा आदी बाबतीत सर्वोत्तम कामगिरी कशी होईल याकडे माझा कटाक्ष असतो. संसदेच्या गेल्या तीन टर्ममधील माझ्या कामगिरीची आकडेवारी ही कोणालाही तपासून पाहता येईल.

माझ्या संसदीय कामगिरीची दखल घेऊन मला आठ वेळा संसदरत्न तर दोन वेळा संसद महारत्न आणि युनिसेफचा पार्लमेंटरी अवार्ड फॉर चिल्ड्रन अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आज देशातील सर्वोत्कृष्ट खासदार असा होणार माझा उल्लेख, हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. कारण आपण सर्वांनीच मला माझ्यावर विश्वास टाकून मोठ्या जबाबदारीने संसदेत निवडून पाठविले. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत असते. माय बाप जनतेची सेवा, शेतकरी व महिलांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हिच माझ्या कामाची त्रिसूत्री आहे. हीच त्रिसूत्री जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा आहे आणि दिशाही आहे.

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाशी व येथील जनतेशी पवार कुटुंबियांचे सहा दशकांहून अधिक काळापासूनचे ॠणानुबंध आहेत. ते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहेत. मतदारसंघातील बहुतेक सर्व शहरे, खेडी, वस्त्यांवर जाऊन प्रत्येकाशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो. प्रत्येकाचे काही ना काही म्हणणे असते, ते जाणून घेऊन त्याचे समाधान करण्यासाठी काम करण्याला माझे प्राधान्य असते. 'आपला मतदार संघ हा आपला अभिमान आहे' आणि म्हणूनच आपला बारामती लोकसभा मतदारसंघ देशातील क्रमांक एकचा मतदारसंघ व्हायला हवा. यासाठी येथील आरोग्य, शिक्षण आदी सुविधा सर्वोत्तम असाव्या. शेतीसह उद्योग उत्कृष्ट दर्जाचा असावा. रोजगार-व्यवसाय, दळणवळण आदी सुविधा दर्जेदार असाव्या. आपल्या मतदारसंघाचा ऐतिहासिक वारसा-ठेवा यांचे जतन व विकास व्हावा. हे करताना पर्यावरणाचाही समतोल राखला जावा ही माझी भूमिका असते. या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी गेली पंधराहून अधिक वर्षे अविश्रांत काम करत आहे.

आदरणीय पवार साहेबांनी दाखविलेला स्वाभिमानी, निडर आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याचा संघर्षाचा मार्ग मी निवडला आहे. आपण सर्वजण मला या वाटचालीत साथ सोबत करत आहात, ही माझ्यासाठी अतिशय सामाधानाची बाब आहे.आपल्या सर्वांच्या साथीने यावर्षी देखील मी पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवित आहे. आपण सर्वजण पुन्हा त्याच विश्वासाने खंबीरपणे माझ्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या स्वाभिमानी, विकासाची वाट दाखविणाऱ्या आणि मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या व त्यासाठी सदैव काम करणाऱ्या विचारांची निवड कराल हा विश्वास आहे. म्हणूनच माझी मनःपूर्वक विनंती आहे की, येत्या लोकसभा निवडणुकीत आपण पुन्हा एकदा माझ्या नावासमोरील बटण दाबावे आणि माझी निवड करुन भरघोस मतांनी विजयी करून आपल्या सेवेची संधी द्यावी.

धन्यवाद,
सुप्रिया सुळे

महाराष्ट्राचा संसदेतील बुलंद आवाज | Voice in Parliament | SupriyaTai Sule

16.03.2024
1414
30
13

विकास पर्व २०१९ ते २०२४ | Development Work 2019-2024 | Supriyatai Sule

16.03.2024
1814
57
5

सुप्रियाताई सुळे यांची संसदेतील कामगिरी | Parliamentary Performance | Supriyatai Sule

16.03.2024
1118
38
5

सामाजिक न्यायासाठी आग्रही भूमिका | Social Justice | Supriyatai Sule

16.03.2024
249
7
2

Rap Song | Supriyatai Sule

17.03.2024
Rap Song | Supriyatai Sule Do listen and share! Recorded, Mixed and Mastered - Dotwave Studios, Pune. Music, Lyrics and Rapper - Satyajeet Ranade #BaramatiLoksabha #SupriyaSuleRapSong #SupriyataiRapSong
35640
636
51

सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाची, तुतारी फुंकूया राष्ट्रवादीची...

26.03.2024
सेवा, सन्मान आणि स्वाभिमानाची, तुतारी फुंकूया राष्ट्रवादीची... अवश्य ऐका आणि शेअर करा! #baramatiloksabha #loksabha2024 #NCPSP #seva #sanman #swabhiman
6595
124
5