महाराष्ट्र

[ABP Majha]सुप्रिया सुळे बैलगाडीतून स्ट्रॉबेरीच्या शेतात

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद  खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर करत स्ट्रॉबेरीच्या शेतात फेरफटका मारला.खासदार सुप्रिया सुळे यांनी बैलगाडीची सफर केली आहे.बैलगाडीची सफर करुन त्या थेट स्ट्रॉबेरीच्या शेतात पोहचल्या.पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी त्या गेल्या होत्या.त्यावेळी त्यांनी स्ट...

Read More
  556 Hits

[Lokmat]"देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी

खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा...": सुप्रिया सुळे  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करताना मोठा गौप्यस्फोट केला होता.यावरून आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्र...

Read More
  612 Hits

[TV9 Marathi]पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न

Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे  महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. यावर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्र...

Read More
  546 Hits

[Abp MAJHAA]देशात काँग्रेसचं सरकार आलं तरी गडकरींना केंद्रीय मंत्री करावं का?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते चांगले मंत्री, त्यांना...  Supriya Sule On Nitin Gadkari: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कामांचं कौतुक विरोधी पक्षातील नेते देखील वारंवार करत असताना दिसतात. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करत एक महत्वाचं वक्तव्य केल...

Read More
  504 Hits

[TV 9 Marathi]‘हे’ बाळासाहेबांना कधीच पटलं नसतं

सुप्रिया सुळे यांनी खंत बोलून दाखवली… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ठाकरे-पवार कुटुंबाचे संबंधांवर भाष्य केलंय. "बाळासाहेब ठाकरे आणि पवार कुटुंबियांचे पाच दशकांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. बाळासा...

Read More
  531 Hits

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) - कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण ...

Read More
  554 Hits

[Hindustan Samachar]मंत्रालयातील कंत्राटी कामगारांना सहा महिने पगार नाही ही गंभीर बाब - सुप्रिया सुळे

मुंबई, २० जानेवारी, (हिं.स.) - मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. याशिवाय मंत...

Read More
  503 Hits

[TV 9 Marathi]मला मोदी यांची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी…

सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते. ग्रामपंचायत निवडणूक असली तरी मोदींना पळायला लागते. ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावं लागत...

Read More
  567 Hits

[महाराष्ट्र लोकमंच] इंदापुरात भीमेकाठी पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  इंदापूर : राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रिसॉर्ट उभे करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रि...

Read More
  610 Hits

[महाराष्ट्र टाईम्स] देशाच्या सीमेचं १७ वर्ष रक्षण, शेतीत राबले

अभ्यासाची जोड, ४० व्या वर्षी MPSC तून अधिकारी पुणे : भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता अक्षय झुरुंगे यांनी स्पर्धा परीक्षा दिली. ते सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी बनले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिकाला भे...

Read More
  675 Hits

दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस चौकी स्थापित करावी

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  दौंड, दि. १४ (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील वरवंड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. तसेच येथे पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ परिसरातील विद्यार्थी आणि नागरीक येत असतात. या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता वरवंड येथे पोलीस चौकीची गरज आहे, तरी लवकरात लवकर याठिकाणी चौक...

Read More
  595 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने वारजे भागात उद्या रिंगण भजन सोहळ्याचे आयोजन

खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती पुणे, दि. १४ (प्रतिनिधी) - नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने उद्या (दि.१५) 'संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वारजे येथील अतुल नगर भागात अविस्मरा सेलिब्रेशन्स, चितळे बंधू मिठाईवाले शेजारी येथे उद्या दुपारी साडेचार वाजता ...

Read More
  750 Hits

[Max Maharashtra] राजमाता जिजामाता जयंती निमित्त खासदार सुप्रिया सुळे Live

 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. करोना महमारीच्या निर्बंधांमुळे मागील दोन वर्षे जन्मोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडत आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी ...

Read More
  640 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सिंहगडावर उद्या स्वच्छता अभियान

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. ८) सकाळी 'आपला सिंहगड आपला अभिमान' अंतर्गत किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास सुप्रिया सुळे या अभियानात सहभागी होणार असून जास्तीत जास्त गडप्रेमींनी याभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नरवीर सरदार तान्...

Read More
  617 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे खानवडी येथे मंगळवारी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

पुरंदर, दि. ३१ (प्रतिनिधी) - महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मासूम या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी येत्या मंगळवारीआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हे आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. महिलां...

Read More
  712 Hits

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी - सुप्रिया सुळे

पुणे : महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवला. (Supriya Sule on Dhangar reservation). शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत, ही बाब लक्षात आणून देत भाजप आणि केंद्र सरकारने याबाबत आपल...

Read More
  523 Hits

धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - खासदार सुप्रिया सुळे

लोकसभेत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची भूमिका होती, परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे म्हणाले. नेमकी धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. धनगर समाजाशी खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आल...

Read More
  482 Hits

‘आरक्षणा’वरून सुप्रिया सुळे आक्रमक

नवी दिल्ली/ बारामती : धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. गेल्या आठवड्यात लोकसभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, की महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. त्यानंत...

Read More
  555 Hits

आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन

आजची स्त्री घराच्या रुढ चौकटीतून बाहेर पडली आहे. आता तिचा वावर जवळपास सर्वच क्षेत्रात आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते. स्वतःच्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी ती सक्षम आहे. अर्थात अजूनही त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अशा एकट्या महिलांची आपण जेंव्हा चर्चा करतो तेंव्हा मला माझ्या आजीची आवर्जून आठवण येते. आई खुप लहान असतानाच माझे आजोबा सदुभाऊ शिंदे यांचे निधन झाले. त्यावेळी माझी आजी निर्मला शिंदे यांचे वय केवळ सत्तावीस वर्षांचं होतं. या संकटाला आजी मोठ्या धीराने सामोरी गेली. आजोबांच्या पश्चात तिनं सगळ्या मुलांचं संगोपन मोठ्या हिंमतीनं केलं. माझ्या आजीचं हे एकटीनं सर्व काही सांभाळणं म्हणजे नेमकं काय होतं त्याची कल्पना लहान वयात मला आली नाही, पण जसजसं जाणीवेच्या कक्षा रुंदावत गेल्या तसतशी मला ते उलगडत गेलं. आजीबद्दलचा माझा आदर अधिकच वाढला. कळत्या वयात मी विचार करायचे की, आजीला कधी एकटेपणा जाणवला असेल का ? हक्कानं मनातलं सगळं काही रिकामं करावं असा माणूस तिच्या आयुष्यातून तर केंव्हाच निघून गेला होता. अशा वेळी तिनं कितीदा तरी स्वतःशीच संवाद साधला असेल. स्वतःलाच तिनं जीवन जगण्यासाठी खंबीर केलं असेल. पुढे मी जेंव्हा सामाजीक जीवनात प्रवेश केला तेंव्हा अशा अनेक एकाकी महिलांशी माझा संपर्क आला. यशस्विनी, जागर, उमेद अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात मला थोडी का होईना अशा फुलविता आली, याचे समाधान आहे. मात्र ते पुरेसे नाही याची जाणीवही आहे. त्यांचा संघर्ष, जगण्याची धडपड या सर्वांशी मी जोडली गेली. त्या सर्वांमध्ये मी माझ्या आजीचा जीवनसंघर्ष पाहत असते. आजीच्या जीवनसंघर्षात एक अदृश्य पोकळी आहे, असं मला नेहमी वाटतं. ती पोकळी तिनं कुठंच कधीच शेअर केली नसली तरीही... हीच पोकळी मला भेटायला येणाऱ्या एकल महिलांमध्ये जाणवते. कदाचित तीच त्यांना माझ्याशी घट्टपणे जोडणारा, किंबहुना माझ्यासाठी; मला तो धागा माझ्या दिवंगत आजीशी जोडतो. त्यांच्या एकटेपणाच्या वाळवंटात प्रेमासारख्या भावनेचं ओअसीस फुलायला हवं असं मला वाटतं म्हणूनच एकल महिलांविषयी लिहिण्यासाठी मी जाणीवपूर्वक १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निवडला आहे. हा दिवस प्रेमाचा संदेश देणारे युरोपातील संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. तत्कालिन रोमन सम्राटाचा आदेश झुगारुन संत व्हॅलेंटाईन यांनी सर्वदूर प्रेमाचा संदेश रुजविला (भारतीय समाजात आज विविध समाज घटकात हा प्रेमाचा संदेश देण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे. कारण द्वेषाला, सूडाला बळ देणाऱ्या शक्ती प्रबळ होताना आपण रोजच अनुभवतो आहोत. ). त्यासाठी त्यांनी मरणही पत्करले. प्रेमासाठी मरण पत्करणारा हा संत म्हणूनच पुढच्या पिढ्यांसाठी प्रेमाचा संदेश देणारा देवदूत ठरला. प्रेम ही माणसाची अतिशय तरल भावना. ही भावना सर्वांसाठी आणि सर्वसमावेशक अशीच... म्हणूनच तिचे वेगळेपण नजरेत भरणारे ठरते. व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने एकल महिलांचा मी विचार करते तेंव्हा माझ्यासमोर परीत्यक्ता, विधवा आणि इतर काही कारणांमुळे एकट्या राहिलेल्या महिलांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. या महिला मानसिकदृष्ट्या कणखर जरी असल्या तरी अचानक आलेल्या संकटाने सुरुवातीच्या काळात कांहीशा बावरुन गेलेल्या असतात. पण संकटांचा सामना करण्याची जिद्द त्यांच्यात असते. क्वचितच एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या कोलमडून पडलेली तुम्हाला आढळेल. हजारो संकटांचा सामना करुन त्या संकटांना परतावून लावतात. संकटांशी झुंजताना त्या अनेकदा माझ्याकडे खंत व्यक्त करतात ती म्हणजे जिथं आपण व्यक्त होऊ अशी एक जवळची व्यक्ती असायला हवी होती. मला वाटतं, आयुष्याशी दोन हात करणाऱ्या या शूर महिलांसाठी आपण सर्वांनीच व्हॅलेंटाईन म्हणून उभे ठाकले पाहिजे. त्यांच्या मनात एकाकीपणाची भावना रुजू नये. त्यांच्या संघर्षाला सतत बळ मिळावं. त्यांना यश मिळावं म्हणून त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्यासोबत रहायला हवं. याची सुरुवात अर्थातच घरातूनच व्हायला हवी. आई-वडील, भाऊ-बहीणी आणि इतर नातेवाईकांनी त्यांचे हे एकटेपण स्वीकारावं. त्यांना माणूस म्हणून त्यांची स्पेस जपू द्यावी. ही स्पेस त्यांच्यासाठी स्वतःशी हितगूज करण्यासाठी आवश्यक असते. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आपण त्यांना ही भेट तर नक्कीच देऊ शकू, नाही का ? कारण आदरणीय कविवर्य कुसूमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे, "प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्षआणि भविष्यकालातील अभ्युदयाची आशा एकमेव "म्हणून हा आशेचा दीप तेवत ठेवूया...! -सुप्रिया सुळे, खासदार

Read More
  575 Hits

त्यांना हंडामुक्त करण्यासाठी जलव्यवस्थापन हवे..

प्रत्येक सजीवासाठी पाणी ही मुलभूत गरज आहे. भारतीय उपखंडात पाण्याची गरज मुख्यत्वे मोसमी पावसाच्या माध्यमातून भागविली जाते. मोसमी पाऊस हे या उपखंडाला लाभलेले निसर्गाचे अनोखे वरदान आहे. मोसमी पावसाच्या माध्यमातून नद्यांसारखे जलस्रोत ओसंडून वाहू लागतात. त्यांच्या माध्यमातून माणसाची पाण्याची गरज पुर्ण होते. प्राचीन काळापासून नद्यांच्या काठावरच मानवी संस्कृती वसली याचे मुख्य कारणही पाण्याची गरजच आहे. प्राचीन काळी मानवी संस्कृतीही गंगा, ब्रह्मपुत्रा, सरस्वती असा जलस्रोतांच्या आसपासच वसली. जेथे मुबलक पाणी तेथे जगण्याच्या संधी अधिक, म्हणूनच पाण्याला जीवन असेही म्हणतात. जागतिक जलदिनाच्या निमित्ताने पाण्याचे नव्हे तर जीवनाचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा जगभरात घेतली जाते. गेल्या काही वर्षांतील वातावरणीय बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पाण्याच्या व्यवस्थापनास अपिरमित महत्त्व आले आहे. जलव्यवस्थापनाच्या मुद्याकडे वळण्यापुर्वी खान्देशातील हल्लाबोल आंदोलनाच्या काळात आलेला एक अनुभव मला नमूद करायचा आहे. या आंदोलनाच्या दरम्यान अनेक महिलांनी पाणीटंचाईमुळे होत असलेला त्रास सांगितला. हंडाभर पाण्यासाठी त्यांना दूर जावे लागते, यामुळे अनेक कामे अडून राहतात असेही त्यांनी सांगितले. त्यावेळीच एक खुणगाठ मनाशी बांधली की, महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमस्वरुपी काढायचा. राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईची स्थिती भीषण आहे. पाण्याचे अनियमित झालेले चक्र आणि जलव्यवस्थापनाच्या बदललेल्या पद्धती यांचा सर्वात मोठा फटका महिलांना बसतो. मानवी श्रमाचे जे अमूल्य तास देशाच्या कारणी लागायला हवेत, ते पाण्याची सोय करण्यात वाया जातात. पाण्याची टंचाई हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात उभा आहे. सर्वांना पिण्याचे स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे किंबहुना स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिणे हा त्याचा मुलभूत अधिकार ठरायला हवा. संसदेत ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे त्या भागाच्या पाचवीलाच दुष्काळ, अवर्षण अशी संकटं पुजलेली असत, असं कोणी सांगितलं तर आज कदाचित विश्वास बसणार नाही. या भागाचे गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळ प्रतिनिधीत्त्व करणारे शरद पवार साहेब यांच्या प्रेरणेतून येथे जलसंधारणाची मुलभूत कामे मोठ्या प्रमाणावर झाली. यामुळेच येथील बहुतांश भाग हा सिंचनाखाली आला. विशेष म्हणजे येथील जनतेनेही जलसंधारणाचं तत्त्व समजून घेऊन ते जोपासलं आहे. योग्य जलव्यवस्थापन केल्यामुळे आज हा भाग कृषीक्षेत्रातील प्रगतीचे एक मॉडेल म्हणून भारतात सर्वत्र नावाजला जातो. पाण्याची नासाडी थांबून त्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने २२ मार्च हा दिन जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या क्षेत्रात बारामती अथवा अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावांनी केलेल्या कामाचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते. गेल्या काही वर्षांत पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याची कधी नव्हे तेवढी गरज निर्माण झाली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन आता करावेच लागेल असा इशारा निसर्गाने देण्यास सुरुवात केली आहे. वाढती लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येचे भरणपोषण करण्यासाठी कृषी क्षेत्रावर आलेला दबाव पाहता आगामी काळात उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध जलस्रोत असो किंवा पावसाचे पाणी, ते अधिकाधिक प्रमाणात जतन करण्यातच खरा शहाणपणा आहे. भूजल पातळीतील घट लक्षात घेता जमीनीत अधिकाधिक प्रमाणात पाणी मुरवून ठेवणे आवश्यक आहे. गेल्या पन्नास वर्षांची आकडेवारी आपण लक्षात घेतली तर दरडोई पाण्याची उपलब्धता एक तृतीयांशाने कमी होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भाग नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतात. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा व इतर विभागामधील अनेक जिल्ह्यांचा यात समावेश आहे. हे सर्व लक्षात घेतल्यास शेती आणि दररोजच्या वापरासाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. किंबहुना अलिकडच्या काळात त्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. जलसंवर्धनाच्या तंत्राचा आपण जेंव्हा विचार करतो तेंव्हा इस्त्रायलचे उदाहरण देणे आवश्यक आहे. जगाच्या नकाशावर ठिपक्याप्रमाणे दिसणाऱ्या या देशाने जलस्रोतांचे उत्तम नियोजन करुन कृषीक्षेत्रात जी झेप घेतली आहे ती थक्क करणारी आहे. आपल्याकडेही या राष्ट्राच्या कामगिरीचा वस्तुपाठ गिरविण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरात आणलेली पाणीयोजना असो किंवा महात्मा जोतीबा फुले यांनी सुचविलेली सिंचनाची पद्धती ही त्या दोन द्रष्ट्या युगपुरुषांनी ओळखलेली काळाची पावलेच होती. आपण फक्त त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने चालण्याची गरज आहे. सध्या तरी आपण शहरी असो किंवा ग्रामीण, प्रत्येकाने पाण्याच्या नियोजन आणि वापराबाबत जागरुक झाले पाहिजे. यामध्ये शेतीसाठी वापरात येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन, घरगुती पाण्याचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, विहीर पुनर्भरण आणि रेनवॉटर हार्वेस्टींग अशा तंत्रांचा वापर करण्याची गरज आहे. शहरांमध्ये सोसायटी तेथे रेन वॉटर हार्वेस्टींग आणि सांडपाणी पुनर्वापर यंत्रणा अशा मोहिमा राबविण्याची आवश्यकता असून यासाठी जनतेचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय शासकीय पातळीवरुनही अशा प्रयोगांना बळ दिले पाहिजे. सिंचनाखाली जास्तीत जास्त जमीन कशी आणता येईल आणि कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. याशिवाय भूजलाच्या वापरावरही मर्यादा नसल्यामुळे जमीनीच्या पोटात कोट्यवधी वर्षांपासून साठलेले पाणी माणसाने अक्षरशः हिसकावून बाहेर काढले आहे. परिणामी देशातील...

Read More
  586 Hits