महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठे नाते म्हणजे बहीण आणि भावाचे नाते. या निर्मळ नात्याचा अपमान महाराष्ट्र सरकारने केला आहे. असा आरोप खासदार सुप्र...
MP Supriya Sule Big Allegation : लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडा...
Supriya Sule on ladki bahin: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजने...
नवी दिल्ली : 'लाडकी बहीण योजना' सुरू झाल्यापासूनच विविध कारणांमुळं ही योजना चर्चेत राहिली आहे. कधी बोगस आधार कार्ड दाखवत या योजनेचे पैसे उकळले, तर कधी सरकारी महिला कर्मचाऱयांनीही या योजनेचा लाभ ...
Mumbai : लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक...
लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्...
'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्र...
e'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्...
'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्र...
म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: 'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही'...
इंदापूर : बारामती हा देशातील आदर्श लोकसभा मतदारसंघ करण्याचा माझा संकल्प आहे. रक्तक्षय तसेच कुपोषण मुक्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देत आहे. नकोशी मुलगी हवेशी होण्यासाठी सायकल वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. मुलींनी माहेरची आठवण म्हणून सायकल लग्न झाल्यानंतर सासरी नेवू नये असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल मैदानावर इंदापूर विधान सभा मतदारसंघातील आशा वर्कर्स तसेच शालेय युवतींना सुमारे दोन कोटी रूपयांच्या ती हजार सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. सुळे यांनी युवतींशी सुसंवाद साधत त्यांना बोलते करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे पुन्हा प्रकृती अस्वस्थतेमुळे कार्यक्रमास येवू शकले नाहीत.
सौ. सुळे म्हणाल्या की बारामती लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्रत्येकी दहा हजार श्रवणयंत्रे व सायकलींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या धोरणाने गरिब महिला व शेतक-यांसाठी लढण्यास कटिबध्द आहे. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना सर्वप्रथम रक्तक्षय मुक्त करण्याचे धोरण आहे. महिलांच्या कर्करोगाचे निदान व्हावे म्हणून देशात सर्वप्रथम पुणे जिल्हाप रिषदेने कार्यक्रम हाती घेतला आहे. युवती व महिला सुरक्षितपणे फिरल्या पाहिजेत हे माझे स्वप्न असून हे स्वप्न पुर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य देवू.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मामून काम करणा-या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या प्रतिनिधी असल्याने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. खासदार सुळे या आदर्श संसदपटू असून त्यांनी सर्वत्र जनसंपर्क ठेवून विकासकामे केली आहेत. सायकल वाटप कार्यक्रमामुळे युवती व महिला त्यांना कधीच विसरणार नाहीत.