2 minutes reading time (388 words)

[tv9marathi]राम कृष्ण हरी, वाजली ना तुतारी!

राम कृष्ण हरी, वाजली ना तुतारी!

बारामती, भोरमधून सुप्रिया सुळेंना सर्वात मोठं लीड

लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येणार सहा विधानसभा मतदारसंघांमधील आकडेवारी पाहिली तर पाच मतदारसंघात त्यांना लीड मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीलही मतदान सुप्रिया सुळे यांना जास्त झालं आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राहुल कुल आमदार आहेत. या मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना २६,३३७ चं लीड मिळालं, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आमदार असून त्या ठिकाणीही सुप्रिया सुळेंना २५, ९५१ मतांच लीड, अजित पवार यांचा स्वत:चा मतदार संघ असलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना सर्वाधिक ४७,३८१ मतांच लीड मिळालं. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार असून त्या ठिकाणीही ३५ हजार मतांचं लीड, भोर तालुक्यातही सुप्रिया सुळे यांना दुसरं सर्वाधिक ४३,८०५ लीड मिळालं. भोरमध्ये काँग्रसचे संग्राम थोपटे आमदार आहेत. खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांना फटका बसला, या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना २०,७४६ मतांचं लीड मिळालं होतं. तर सुप्रिया सुळे यांना एकूण ७,३१,४०० तर सुनेत्रा पवार यांना एकूण ५,७३,३९१ मते मिळाली आहेत. सुप्रिया सुळे एकूण १, ५८, ००९ लीडने निवडून आल्या.

अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती. जनतेने सुप्रिया सुळे यांना कौल दिला. अजित पवारासांठी धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या पाच जागांवरील फक्त एकाच जागेवर त्यांना विजय मिळवता आला. रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी विजय मिळवला तर शिरूरमध्ये उभे असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही पराभव झाला. त्यासोबतच अर्चना पाटील आणि महादेव जानकर यांचाही पराभव झाला.

विधानसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार
लीड
दौंड 92,064 65,727 26,337
इंदापूर1,14,02088,06925,951
बारामती14394196,560 ,47,381
पुरंदर1,25,94890,66735,281
भोर1,34,24590,44043,805
खडकवासला1,21,1821,41,92820,746
एकूण7,31,4005,73,3911,58,009
...

राम कृष्ण हरी, वाजली ना तुतारी! बारामती, भोरमधून सुप्रिया सुळेंना सर्वात मोठं लीड, सुनेत्रा पवारांना कुठे फटका? - Marathi News | Lok Sabha election 2024 Baramati Supriya Sule lead Bhor And baramati which constituency did Sunetra Pawar lose votes news in marathi | TV9 Marathi

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. या निकालामध्ये सुप्रिया सुळे या दीड लाखांच्या लीडने निवडून आल्या होत्या. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची अटीतटीची लढत होणार असं वाटतं होतं. मात्र सुप्रिया सुळेंनी मोठा विजय मिळवला.
[Lokmat]चुरशीची लढाई एकतर्फी; सुप्रिया सुळे विजयी
[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिष...