1 minute reading time (93 words)

[Saam TV]मुख्यमंत्र्यांनी दबावात न येता खरात प्रकरणाची चौकशी फास्टट्रॅक कोर्टात करावी

मुख्यमंत्र्यांनी दबावात न येता खरात प्रकरणाची चौकशी फास्टट्रॅक कोर्टात करावी

राज्यात नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवार लैंगिक अत्याचार करुन शोषण केल्याचे समोर आले. अनेक महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सध्या अशोक खरातची SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, अशोक खरातचे राजकीय कनेक्शनची देखील चर्चा झाली. आता  भोंदू अशोक खरात हा एकटा नाही. हे एक खूप मोठे रॅकेट आहे. एक भोंदूबाबा अजून काय-काय उद्योग करत होता हे देवालाच ठाऊक? पण, केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणी कोणतीही तडजोड न करता, कोणत्याही दबावाला न बळी पडता या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी  केली. 

[Mumbaii Outlook]Ashok Kharat प्रकरणात बडे अधिकारी...
[Asianet News Marathi]सुप्रिया सुळे यांचा सरकारवर ...