1 minute reading time
(87 words)
[Mumbaii Outlook]Ashok Kharat प्रकरणात बडे अधिकारी व नेते गुरफटलेत; CM Fadnavis यांनी लक्ष द्यावे!
भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे जावेसे का वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून आणि व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरलो आहोत, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त ेली. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीत पारदर्शकता ठेवून त्यात सातत्य ठेवावे. त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. प्रस्तुत प्रकरणात सत्तेतील अनेक लोकांचा समावेश आहे. या भोंदूबाबाच्या विरोधात पोलीस यंत्रणा आणि गृहमंत्रालय जे काही करत आहे ते स्वागतार्ह आहे. चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे. पण महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत.''

