2 minutes reading time (304 words)

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा विवाह सोहळा मुंबईत 20 जून रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं.

सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत अरुण लखानी आणि त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्यासाठी रेवती सुळे आणि सारंग लखानी हे देखील उपस्थित होते. रेवती सुळे यांच्या लग्नाच्या आमंत्रणासंदर्भात भेट झाल्याची माहिती आहे.

सुप्रिया सुळे यांनी देशाचे संरक्षण मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांना देखील पत्रिका दिल्याची माहिती आहे.

सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह , लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी , सोनिया गांधी , प्रियांका गांधी आणि भूपेंद्र यादव, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. रेवती सुळे यांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी सहपरिवार भेट झाल्याचे कळते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची दिल्लीतील 10 जनपथ इथं भेट घेऊन मुलगी रेवती सुळेच्या लग्नाचं निमंत्रण दिल्याची सूत्रांची माहिती आहे. केरळमचे नवनिर्वाचित काँग्रेसचे मुख्यमंत्री वी. डी. सतिशन यांचीही सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत भेट घेतली. 

...

Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण | Revati Sule and Sarang Lakhani Marriage Supriya Sule meet Narendra Modi and Mallikarjun Kharge other leaders in New Delhi Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा विवाह सोहळा मुंबईत 20 जून रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं.
[Zee 24 Taas]पत्रकार परिषदेतून सुप्रिया सुळे LIVE