सुरक्षित रस्त्यासाठी सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सुरक्षित रस्त्यासाठी सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्यात दरवर्षी १० लाखापेक्षा अधिक लोक अपघातात ठार होतात. त्यामुळं रस्ता सुरक्षा धोरण ठरवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं रस्ता सुरक्षा धोरण प्राथमिक रित्या करण्यात आलं. त्यात प्रवासी विमा, गाडीचे चालक, वाहक यांचा विमा यासह आरोग्य, रस्ते, अपघाती क्षेत्रातल्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या सूचना केल्या आहेत. येत्या काळात राज्यात परिवहन, गृह आणि बांधकाम खात्याच्या माध्यमातून धोरण तयार करण्याची मागणी सुळे यांनी केली.

Read More
  663 Hits

पवारांकडून दादांची पाठराखण तर ताईंचं कौतुक

पवारांकडून दादांची पाठराखण तर ताईंचं कौतुक

राष्ट्रवादीच्या राज्यव्यापी अधिवेशनाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिवेशनाचं उद्घाटन केलं. यावेळी पवार कुटुंबियांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं सांगण्याचा शरद पवारांनी प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना यावेळी संबोधताना शरद पवार यांनी सिंचनप्रश्नी अजितदादांची पाठराखण करत सुप्रिया सुळेंच्या युवती मेळाव्यातील कामाचं कौतुक केलं. धरणांच्या निकृष्ट कामांसाठी नेते नव्हे तर अभियंते किंवा कंत्राटदार जबाबदार असतात, असं सांगत पवारांनी अजितदादांना क्लीन चिट दिली. तर युवती मेळाव्यामुळे राज्यात नवं नेतृत्त्व तयार होत असल्याचं पवारांनी सांगितलं. दरम्यान यावेळी शरद पवारांनी लवासाप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी वाय पी सिंह य...

Read More
  566 Hits

दादाबद्दल अनेक गैरसमज, तो अतिशय प्रेमळ, हळवा : सुप्रिया सुळे

दादाबद्दल अनेक गैरसमज, तो अतिशय प्रेमळ, हळवा : सुप्रिया सुळे

अजितदादाबद्दल अनेक गैरसमज झाले आहेत. असे गैरसमज पसरवले जात आहेत. दादा कमी बोलणारा आहे, अतिशय प्रेमळ, हळवा आहे, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ‘एबीपी माझा’च्या  ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होत्या. “अजितदादांवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. पवार फॅक्टर 50 वर्षे महाराष्ट्रात टिकून आहे, त्यामुळे त्यांच्यावर आरोप करून अनेकजण मोठे होण्याचा प्रयत्न करत आहेत” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. बोलण्याच्या ओघात त्याच्याकडून चूक झाली. त्याबद्दल त्याने जाहीर ऑन कॅमेरा माफी मागितली. अशी माफी मागायलाही हिम्मत लागते, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. आघाडी टिकावी ही इच्छाकाँग्रेस-राष्ट्रवादीची आ...

Read More
  593 Hits

सुप्रिया सुळे यांचा दौंड नगरपालिकेवर मोर्चा

सुप्रिया सुळे यांचा दौंड नगरपालिकेवर मोर्चा

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून दौंडमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. दौंड रेल्वे जंक्शन आणि शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, वाहतुकीची समस्या दौंडवासीयांना मोठ्या प्रमाणात सतावत आहे. त्यासाठी शहराअंतर्गत जाणाऱ्या रेल्वे लाईनखालून भुयारीमार्ग मंजूर केला. मागील वर्षी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी या मार्गाचं भूमीपूजन केलं.निधीही मंजूर झाला.  पण तरीही नगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यास टाळाटाळ करते असा आरोप सुप्रिया सुळेंनी केल...

Read More
  709 Hits

मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्रिया सुळे

मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्रिया सुळे

दुष्काळाची भीषणता बघून राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आजपासून दोन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर ड्रिप इरिगेशनला पर्याय नाही. त्यामुळे ऊस बंद करणं हा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असलं पाहिजे, त्यामुळे दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याबाबत विचार करा, असंही सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे. दरम्यान मराठवाड्यातल...

Read More
  539 Hits

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार प्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली. बलात्कार होऊन तीन दिवस लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणा का दिरंगाई करतात, असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधला. महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला अभिमान  होता, पण नगरच्या घटनेत पोलिसांनी २ दिवस माहिती बाहेर येऊ नाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावायला एवढा उशीर का केला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभेत पडसाददरम्यान राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत. कारण, विरोधक विधानसभाध्यक्ष हरिभा...

Read More
  612 Hits

कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा....

कोपर्डीप्रकरणी दोन दिवसात चार्जशीट दाखल करा, अन्यथा....

कोपर्डी बलात्कार प्रकरणात जर येत्या दोन दिवसात चार्जशीट दाखल झालं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. आज त्या नाशिकमध्ये बोलत होत्या. कोपर्डीप्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करु, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र आज कोपर्डी घटनेला 84 दिवस झाले आहेत. तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाही. नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल झालं नाही, तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते. कपिलची दखल, शेतकऱ्यांची नाहीमुख्यमंत्री कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या तक्रारीची दखल घेतात, पण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आर...

Read More
  587 Hits

...तर दस नंबरी नागीण स्वभाव दाखवेल : सुप्रिया सुळे

...तर दस नंबरी नागीण स्वभाव दाखवेल : सुप्रिया सुळे

"महिलांच्या नादाला लागू नका, अन्यथा ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असे जळजळीत उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. त्या जळगावमध्ये बोलत होत्या. "भाजप सुडाचे राजकारण करत आहे. विरोधकांच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, अशा धमक्या मुख्यमंत्री देत आहेत. मात्र कोणतीही महिला तिच्या गळ्यापर्यंत आल्याशिवाय आवाज काढत नाही. कोणी जर तिला दंश करण्याचा प्रयत्न केला, तर ही दस नंबरी नागीण आपला स्वभाव दाखवल्याशिवाय राहणार नाही", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आस्मान दाखवण्याची भाषा केल्यानंतर, गेल्या काही दिवसात सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या आहेत. सातत्यानं त्या मुख्यमंत्री द...

Read More
  745 Hits

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे

एकीकडे  भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, 'यालाच पार्टी विथ डिफ्रन्स' म्हणायचं का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला विचारला. युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? भाजपला नेमकी कोणती पारदर्शकता हवी आहे, या प्रश्नांची उत्तरं भाजपनं द्यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली. "आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढतो. मी मुंबईत राहते, रस्ते, पाणी या समस्या आहेत. मी स्वतः "कन्फ्युज" आहे, कारण मनपा मधला रस्ते घोटाळा हा भाजपने काढला, भाजप म्हणतं आम्हाला पारदर्शी कारभार हवा, मग रस्ते घोटाळ्याचे काय झालं? त्याचा थेट आरोप शिवसेनेवर आहे, मग आता यांच्यात युती होणार असेल तर सर्व भ्...

Read More
  587 Hits

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते : सुप्रिया सुळे

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते : सुप्रिया सुळे

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेच्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी एक्स्लुझिव्ह बातचीत केली. गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी...

Read More
  562 Hits

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे

'शेतात पिकवलेला कांदा शेतकऱ्याला जाळावा लागतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अशा स्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना झोप कशी लागते?' असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. मनमाड तालुक्यातील अंदरसुल इथं त्यांची सभा झाली. त्याआधी त्यांनी नगरसूलमध्ये एका शेतकऱ्याची भेट घेतली. कांद्याला भाव नसल्यानं कृष्णा डोंगरे यांनी 5 एकर शेतातला कांदा जाळला होता. नांदगावमध्ये शेतकऱ्याने जाळलेला कांदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना भेट देणार आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. येवला तालुक्यातील नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने कांद्याला भाव नसल्याने काल आपल्या 5 एकर शेतातील कांदा जाळला होता. सुप्रिया सुळे येवल्यात आल्या...

Read More
  571 Hits

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरेंनी पोलिसांशिवाय फिरुन दाखवावं’, सुप्रिया सुळेंचं आव्हान

‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले आहेत. आम्ही पोलिसांबद्दल एकही अपशब्द खपवून घेणार नाही, गाठ आमच्याशी आहे. खरंच वाघ असाल तर 'मातोश्री'ची सर्व पोलीस सुरक्षा काढा आणि माझ्यासारखं एकटं फिरून दाखवा, असं शब्दात सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरेंनी आमच्यासारखं एकट्यानं फिरुन दाखवावं’‘उद्धव ठाकरे म्हणतात पोलीस भाजपला विकले गेले आहेत, जाऊन भांडी घासा.’ पोलिसांबद्दल एक शब्द जरी काढला तर गाठ आमच्याशी आहे. उद्धव ठाकरे जर खरच वाघ असतील तर ‘मातोश्री’चे सर्व पोलीस काढा, मी आणि विद्याताई जसे एकटं फिरतो तसं महाराष्ट्रात फिरून दाखवा. उद्धव एका पोलिसाशिवाय बाहेर जात नाही. त्यांना 40 पोलीस लागतात आणि त्याच पोलिसांना नाव ठेवता? मी ...

Read More
  602 Hits

वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील सभेसाठी सुप्रिया सुळेंची बुलेट स्वारी

https://www.youtube.com/watch?v=2m6S1hCxHkc

Read More
  534 Hits

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझा भाऊ माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल : सुप्रिया सुळे

माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधणी कमी”मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवाय, "बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही. मात्र, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हाही प्रश्न आहे.", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, त्यांनी ...

Read More
  533 Hits

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका

शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. नागपूर आमदार निवासातील सामुहिक बलात्कारप्रकरणावरुनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''मुख्यमंत्री नागपुरचा असताना आमदार निवासात बलात्कार होतात, ही दुर्दैवी घटना आहे.'' तसेच कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात,'' अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच शिवसेनेचाही सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ही मोस्ट कन्फ्...

Read More
  579 Hits

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

व्हिजन पुढच्या दशकाचं: राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळेंचं व्हिजन

‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘देशातील वातावरण सध्या बरंच गढूळ झालं आहे. कारण की, कुणी काय खायचं, काय घालायचं यावर बंधन येणं चुकीचं आहे. नागपूरमध्ये त्यादिवशी झालेल्या घटनेनं मला खूप त्रास झाला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणं हे चुकीचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हावं: सुप्रिया सुळे ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे पण आता त्याचं पुरोगामित्व अधोरेखित होण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वच खासदार नेहमीच ऐकी दाखवतात. महाराष्ट्र ...

Read More
  574 Hits

कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला...

Read More
  592 Hits

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

भाजप-शिवसेनेला हात जोडून विनंती.... : सुप्रिया सुळे

जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र "भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांन...

Read More
  638 Hits

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

हल्लाबोल आंदोलनात सुप्रिया सुळेंचा आदिवासी नृत्यावर ठेका

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले. कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याने हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आदिवासींचं एक वाद्य हातात घेत त्यांच्यासोबत ठेका ठरला तर साडी नेसलेल्या एका चिमुकलीचं कौतुकही केलं.  <blockquote class="twitter-video" data-lang="en-gb"><p lang="mr" dir="ltr">पारंपरिक आदिवासी नृत्याने चौथ्या दिवसाचा <a href="https:...

Read More
  639 Hits

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे

महात्मा फुले, सावित्रीबाईंना भारतरत्न द्या: सुळे

महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी संसदेत केल्याची माहिती सुळे यांनी ट्विटद्वारे दिली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मह...

Read More
  601 Hits