https://www.youtube.com/watch?v=2m6S1hCxHkc
माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलताना सांगितले. सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील विविध मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. “मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधणी कमी”मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बांधण्यास कमी पडलो, अशी कबुली सुप्रिया सुळे यांनी दिली. शिवाय, "बाळासाहेबांनी शिवसेनेची चांगली संघटना बांधली, पण रचनात्मक बांधणी नाही. मात्र, संघटना बांधण्यापेक्षा चांगलं काम काय केलं, हाही प्रश्न आहे.", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाय, त्यांनी ...
शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्या काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. नागपूर आमदार निवासातील सामुहिक बलात्कारप्रकरणावरुनही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ''मुख्यमंत्री नागपुरचा असताना आमदार निवासात बलात्कार होतात, ही दुर्दैवी घटना आहे.'' तसेच कर्जमाफीचा निर्णय घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधानांची कॉपी करत मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम करण्यात धन्यता मानतात,'' अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच शिवसेनेचाही सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ही मोस्ट कन्फ्...
‘व्हिजन पुढच्या दशकाचं’ या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘देशातील वातावरण सध्या बरंच गढूळ झालं आहे. कारण की, कुणी काय खायचं, काय घालायचं यावर बंधन येणं चुकीचं आहे. नागपूरमध्ये त्यादिवशी झालेल्या घटनेनं मला खूप त्रास झाला. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना होणं हे चुकीचं आहे.’ असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. महाराष्ट्राचं पुरोगामित्व पुन्हा अधोरेखित व्हावं: सुप्रिया सुळे ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे पण आता त्याचं पुरोगामित्व अधोरेखित होण्याची गरज आहे. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वच खासदार नेहमीच ऐकी दाखवतात. महाराष्ट्र ...
शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला...
जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील, असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. सरकारच्या जाहिरातबाजीवर जोरदार टीकास्त्र "भाजप-शिवसेनेच्या सरकारला हात जोडून माझी नम्र विनंती आहे की, जाहिरातबाजीचे पैसे कृपा करुन बंद करा. कामाला लागा. ते पैसे गरीब शेतकऱ्याला, आमच्या अंगणवाडी सेविकेला, रस्त्यांसाठी आणि विकासकामांसाठी ठेवा. जाहिरातबाजी करुन काहीही होणार नाही. आज गरीब माणसाला त्या निधीची गरज आहे. सिलेंडरची सबसिडी वाढवा किंवा गरीब महिलांना द्या. कर्जमुक्त करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांन...
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकारविरोधात सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावर ठेका धरला. हल्लाबोल आंदोलनाच्या दिवसाची सुरुवात वर्ध्यातून झाली. या आंदोलनात बिडी गावजवळ मेळघाटाहून आलेले काही आदिवासी मंडळी सहभागी झाले. कोरकू आदिवासींच्या गादुली सुसुन या पारंपरिक नृत्याने हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी आदिवासींचं एक वाद्य हातात घेत त्यांच्यासोबत ठेका ठरला तर साडी नेसलेल्या एका चिमुकलीचं कौतुकही केलं. <blockquote class="twitter-video" data-lang="en-gb"><p lang="mr" dir="ltr">पारंपरिक आदिवासी नृत्याने चौथ्या दिवसाचा <a href="https:...
महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या. त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी संसदेत केल्याची माहिती सुळे यांनी ट्विटद्वारे दिली.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मह...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली आहे.फुले दांम्पत्याने आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातले.दलित, शोषित,स्त्री,शेतकरी यांच्या भल्यासाठी ते शेवटपर्यंत झुंजले.आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास सलाम करण्यासाठी,त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे असं देखील त्या म्हणाल्या आहेत .महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. तर देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात सावित्रीबाई फुले यांचा ...
खासदार सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारपुणे, दि. ३० (प्रतिनिधी) – दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येनारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे याना आज प्रदान करण्यात आला. आज (दि. ३०) सकाळी साडेदहा वाजता दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, ‘फेम’चे प्रमुख संदीप मारवाह आणि उमाशंकर ...
संसदेत बारामतीचा आवाज लोकसभेत 95 टक्के उपस्थिती, कामकाजात 90 टक्के सामाजिक सहभागबारामती : प्रतिनिधीदिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्यावतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रे सच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. यामुळे यंदाही संसदेत बारामतीचा आवाज घुमच्याचे दिसते.शनिवारी (दि. 30) सकाळी साडेदहा वाजता दिल्लीतील विज्ञान भवनाच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत खा.सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण ...
प्रभात वृत्तसेवा - सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारMarch 31, 2018 | 9:29 amबारामती -दिल्ली येथील फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि. 30) दिल्ली येथील विज्ञान भवनच्या सभागृहात केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कोळसा आणि खाण राज्यमंत्री हरीभाई चौधरी, माजी खासदार जनार्दन द्विवेदी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्यासह कार्तिकेय शर्मा, राजीव मिश्रा, फेमचे प्रमुख संदीप मारवाह आणि उमा...
सुप्रिया सुळे http://news.supriyasule.net/wp-content/uploads/2018/03/sakal-1.jpgराष्ट्रीयीकृत बँका सातत्याने विविध शुल्कांच्या नावाखाली खातेदारांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली करीत आहेत. पण रिझर्व्ह बँक असो की सरकार, कोणतीच यंत्रणा ग्राहकांच्या नाराजीची दखल घेत नाही. राष्ट्रीयीकृत बँका ग्राहकांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानल्या जात होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या व्यवहारांबाबत शंका निर्माण होत आहेत. विशेषतः काही मोठ्या उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची मोठी देणी थकविल्याचे उघड झाल्यानंतर हा विषय अधिक गंभीर झाला. या व्यावसायिकांना मोठी कर्जे देताना बँकांनीच नियम पायदळी तुडविल्याचे समोर येत आहे. मोठ्या कर्जबुडव्यांकडून होणाऱ्यानुकसा...
पुरंदर विमानतळ आढावा बैठकीस सुप्रिया सुळे यांची उपस्थिती शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवूनलवकरात लवकर काम सुरु करावे. दिल्ली दि. ३ (प्रतिनिधी) – पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळासाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचा त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा. याबरोबरच तेथील पाणी प्रश्न आणि अन्य अडचणींवर योग्य तो मार्ग काढून विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.पुरंदर येथे होत असलेल्या विमानतळासंदर्भात दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात झालेल्या बैठकीस त्या उपस्थित होत्या. या विमानतळाला काही स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. आपल्या जमिनी जाणार म्हणून ते संभ्रम...
पुरंदर_विमानतळ_दिल्ली_बैठक पुरंदर येथील विमानतळाबाबत आज दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक मंत्रालयात झालेल्या बैठकीस सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. विमातळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. तसेच तेथील पाणी आणि अन्य अडचणी तातडीने सोडवून लवकरात लवकर काम मार्गी लावण्याच्या सुचना सुळे यांनी केल्या.
प्रभात वृत्तसेवा -April 4, 2018 | 8:07 am पुणे- पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना जमिनींचा योग्य तो मोबदला मिळायला हवा. याबरोबर तेथील पाणी प्रश्न आणि अन्य अडचणींवर योग्य तो मार्ग काढून विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.पुरंदर येथे होत असलेल्या विमानतळासंदर्भात दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकी...
सकाळ न्यूज नेटवर्क 02.57 AM बाबा-बुवांच्या राज्यमंत्री दर्जाविरोधात आवाज नाहीमुंबई - मध्य प्रदेशमध्ये बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला जातो. तरीही त्या विरोधात समाजातून आवाज उठत नाही, अशी खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी व्यक्त केली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराविरोधी कायद्याची माहिती शाळा - महाविद्यालयांत पोचवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचे स्वागत व अंमलबजावणी परिषदेत त्या बोलत होत्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार नीलम गोऱ्हे आदी...
शिरूर येथील हल्लाबोल आंदोलनात बोलताना सुप्रिया सुळे पुणे, दि. २० (प्रतिनिधी) – केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशभरात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न उभे राहतात, तेव्हा पवार साहेबच धावून येतात. डिजिटल इंडियाची गरज आहेच; पण केवळ त्याने पोट भरत नाही ते काम फक्त शेतकरीच करू शकतो, असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.शिरूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेत त्या बोलत होत्या. पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अन्य नेते तसेच शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते याप्रसंगी उपस्थित होते.राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड मो...
Sandip Kapde Updated Wednesday, 11 April 2018 - 3:22 PMपुणे: “दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांचा उल्लेख केला आहे. हे महाराष्ट्रात प्रथमच घडतेय. शिक्षणात राजकारण कधीच आले नव्हते. मुलांना चुकीचे शिकवू नका! आठ दिवसात ही पुस्तके बदलली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू”. असा इशारा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हल्लाबोल यात्रेदरम्यान बोलतांना केला दिला.महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या पुस्तकात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे गोडवे गायले आहेत. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काहीदवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दादरच्या शिवाजी मंदिरात दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं. तसेच दहावीच्या नव्या अभ्यासक्र...
फुले दांपत्यास भारतरत्न मिळावा संसदेतील मागणीचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पुनरुच्चारपुणे, दि. ११ (प्रतिनिधी) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, या मागणीचा पुनरुच्चार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केला.महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त फुले याना अभिवादन केल्यानंतर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, समाजातील पददलित आणि गोरगरीब वर्गासाठी आणि त्याहून मोठे कार्य म्हणजे स्त्री शिक्षणासाठी फुले दांपत्याने केलेले कार्य लाख मोलाचे आहे. या दोघांचेच हे श्रेय आहे, की आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उभ्या आहेत.अश...