1 minute reading time
(66 words)
[Maharashtra Times]कृषिमंत्र्यांच्या भेटीत काय घडलं? सुप्रिया सुळे लाईव्ह
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीसह आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली..सुप्रिया सुळे यांनी कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे पत्र सादर केले.