1 minute reading time (132 words)

[TV9 Marathi]'आज माझा भाऊच नाही राहिला, आता कोण काय बोलतं त्याने काय फरक पडतो?'

'आज माझा भाऊच नाही राहिला, आता कोण काय बोलतं त्याने काय फरक पडतो?'

मुंढवा गावातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीचा व्यवहार अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये झाला होता. वास्तविक या जमिनीचे बाजारमूल्य 1804 कोटी रुपये होते. तरीही कागदोपत्री 300 कोटी रुपये दाखवण्यात आले आणि आयटी धोरणाचा फायदा घेत मुद्रांक शुल्क माफ करून घेतल्याचा पार्थ पवार यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे या जमीन व्यवहारप्रकरणी पार्थ पवार वगळता 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी महसूल सचिव विकास खारगे यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुपूर्द केल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या अहवालात पार्थ पवार यांना अभय देत या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करत असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चेवरही आपली भूमिका मांडली आहे. 

[News18 Marathi]घोटाळा प्रकरणी Parth Pawar यांनी स...
[ABP MAJHA]माझा दादाच राहिला नाही, त्यामुळे जी चर्...