1 minute reading time (97 words)

[Mumbai Tak]महिला आरक्षण विधेयकावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रेसला सुळेंचं थेट उत्तर

महिला आरक्षण विधेयकावर देवेंद्र फडणवीसांच्या प्रेसला सुळेंचं थेट उत्तर

संसदेत महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील घटनादुरुस्तीचे विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने काँग्रेससह (Congress) विरोधी पक्षांना महिला विरोधी संबोधत रान उठवायला सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, विरोधी पक्षांमुळे लोकशाहीतील महिला सहभागाचा मृत्यू झाला, अशी टीका केली होती. याविरोधात आपण राज्यभरात महिलांच्या विरोधाची लाट निर्माण करुन काँग्रेस पक्षाला त्यांचा निर्णय बदलायला लावू, अशी भूमिका फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून दबाव असल्यामुळे त्यांना तसे बोलावे लागत असेल, अशी टिप्पणी केली. त्या सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 

[ABP NEWS]सुप्रिया सुले का फडणवीस और केंद्र सरकार ...
[Lokshahi Marathi]‘मुख्यमंत्री सांगतील ती जागा...’...