1 minute reading time (125 words)

[Zee 24 Taas]शरद पवार राज्यसभेवर? सुप्रिया सुळे लाईव्ह

शरद पवार राज्यसभेवर? सुप्रिया सुळे लाईव्ह

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया दिली. आपण जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेत गेलो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी खुल्या मनाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली होती, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली. त्याचबरोबर आता शरद पवारांच्या 6 दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर त्यांना पुन्हा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पाठिंबा मिळाला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. 20 वर्षांनी असा योगायोग आल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचेदेखील आभार मानले. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्याला फोन केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

[Loksatta]पार्थ पवारांना काय सल्ला देणार? पत्रकारा...
[Maharashtra Times]सस्पेन्स संपला! मविआकडून राज्यस...