[Maharashtra Times]छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान
स्मारक कोसळण्याच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्घाटनाचा मला "शॉकच" होता
बारामती (दीपक पडकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. पंतप्रधानांना उद्घाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक उभे करताना राज्य शासनाने ऊन, वारा, पाऊस याचा विचार केला नव्हता का ? या सरकारचा मी निषेध करते.
पुरंदरच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासंबंधी त्या म्हणाल्या, उद्घाटनाचा मला शॉकच होता. स्थानिक आमदार, खासदार यांना चार तास आधी कळवले गेले. काल जरी कळवले असते तरी आजचे कार्यक्रम रद्द करता आले असते. उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्याआधी केवळ चार तास आम्हाला कळवलं जात आहे. आम्हाला डावलंले जात असल्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन बैठकीत आमचा बोलण्याचा अधिकार नाकारला जातो, असे राजकाण मी याआधी पाहिलेले नाही. शरद पवार कृषीमंत्री असताना शिरुरचे तत्कालीन खासदार आढळराव पाटील यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने पवार कार्यक्रमाला गेले नव्हते, अशी आठवण सुळे यांनी करून दिली. सत्तेत आम्हीही राहिलो आहे, पण या पद्धतीचे राजकारण केले नाही, असे त्या म्हणाल्या.
हे सरकार विधानसभा निवडणूका पुढे ढकलू पाहत आहे. आज लेकीबाळी सुरक्षित नाहीत. पुण्यात पोलिसांवरच कोयता गँग हल्ले करत आहे. गृहमंत्र्यांनी नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. आता निवडणूकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांना दौरा करण्याचे सुचले असल्याचा टोला त्यांनी लगावला.
सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या पुतळ्याचे काम करणाऱ्या ठाण्यातील कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत… https://t.co/GMHKxiDzah pic.twitter.com/lmacA8HKZZ
— Supriya Sule (@supriya_sule) August 26, 2024