2 minutes reading time (395 words)

[TV9 Marathi]मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या? सुप्रिया सुळेंच्या त्या ट्विटने मोठी खळबळ, कराडला आता थेट…

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या? सुप्रिया सुळेंच्या त्या ट्विटने मोठी खळबळ, कराडला आता थेट…

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं. दरम्यान या हत्याकांडात मुख्य आरोपी हा वाल्मिक कराड असून, तो सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे. मात्र कारागृहात त्याला बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप आहे. या संदर्भात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड कारागृह अधीक्षकांना एक पत्र देखील लिलिलं आहे. वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्या या पत्रामध्ये केला आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत मोठी मागणी केली आहे.

'मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू श्री. धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे. यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. ९ जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे आदी मुद्दे नमूद आहेत. न्यायप्रक्रियेचा हा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी.आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणे याला आमचे प्राधान्य असून आम्ही यासाठी आग्रही आहोत.' असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटनंतर आणि धनंजय देशमुख यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडला आता बीड जिल्हा कारागृहातून नागपूरला हलवलं जाणार? का हे पहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

...

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या? सुप्रिया सुळेंच्या त्या ट्विटने मोठी खळबळ, कराडला आता थेट... - Marathi News | Allegation that Valmik Karad is receiving special privileges in prison Supriya Sule tweets | TV9 Marathi

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती, या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
[Deshonnati]वाल्मिक कराडला बीड कारागृहातून नागपूरल...
[Sakal]वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविध...