[Lokshahi]सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना पत्र; पत्रात काय?
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात सुप्रिया सुळे यांनी लिहिलं आहे की, महानगरपालिका पातळीवरील निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे महानगर पालिकेमधील प्रभागांना लोकप्रतिनिधी नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या समस्या, जसे की लाईट, पाणी, रस्ते, ड्रेनेज, सुरक्षा, वाहतूक कोंडी यासारख्या समस्या त्यांना लोकसभा व विधानसभा प्रतिनिधींकडे मांडाव्या लागत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्यमातून, महानगरपालिका सदस्य ही कामे त्यांच्या पातळीवर वॉर्ड ऑफिस मार्फत करून घेत होते. परंतु सध्या वॉर्ड ऑफिस मार्फत होणारी कामे देखील थंडावलेली दिसून येत आहेत.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, तरी नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी व महानगर पालिकेच्या कामांचे व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने व्हावे व कामात सुसूत्रता यावी यासाठी तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वॉर्ड ऑफिस मार्फत होणाऱ्या कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात ही विनंती. असे सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिस मार्फत होणाऱ्या कामकाजाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करणेबाबत...@AjitPawarSpeaks @PMCPune pic.twitter.com/catKEzMGTC
— Supriya Sule (@supriya_sule) July 5, 2024
