1 minute reading time
(82 words)
[Maharashtra Times]रोहित ज्या पद्धतीने मुद्दे मांडतोय त्याची काळजी वाटते, Supriya Sule यांच्याकडून सुरक्षेची मागणी
अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पवार कुटुंबीयांच्या मनात प्रश्न आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. जय, पार्थ, रोहित यांना याबाबत शंका असून ते अस्वस्थ आहेत असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. रोहित पवार ज्यापद्धतीनं मुद्दे मांडत आहेत त्यावरून सुप्रिया सुळेंनी काळजी व्यक्त केली. रोहित पवार यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी खासदार सुळे यांनी सरकारकडे केली आहे. तसंच राष्ट्रवादी विलिनीकरणाची आमची इच्छा आहे असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. याशिवाय अनेक विषयांवरही सुप्रिया सुळेंनी भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार साहेबांची तब्येत आता बरी असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

