2 minutes reading time (341 words)

[TV9 Marathi]मोठी बातमी! अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, पुणे महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध, पाण्यापासून ते…

मोठी बातमी! अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, पुणे महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध, पाण्यापासून ते…

राज्यात 29 महापालिकांचा निवडणुका आहेत. कुठे युती आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जात आहेत. तर कुठे स्वतंत्रपणे. राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत अजित पवारांची राष्ट्रीवादी असून ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते भाजपाविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चक्क दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र आल्याचे बघायला मिळतंय. नुकताच पुण्यात दोन्ही राष्ट्रीवादीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे उपस्थित होते. महत्वाच्या पाच कामांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. नळाव्दारे नियमित पाणी आणि प्रदूषणमुक्त पणे करणार असल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसले.

अजित पवार यांनी म्हटले की, पाण्याच्या उंच टाक्या उभारणार आहोत. पुणे प्रदूषण मुक्त करण्याचा वादा आहे. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार. नवीन शाळांना मान्यता दिली जाईल. शहरातील झोपडपट्टीचे पुर्ववसन केले जाईल. जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांना नेमके काय काय देता येईल याचे वाचन अजित पवारांनी केले असून मुलभूत सुविधा कशा वाढवता येतील, यावर अजित पवारांकडून भर देण्यात आला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अजित पवार भाजपासोबत लढणार असल्याची सुरूवातीला चर्चा होती. मात्र, शेवटी स्पष्ट झाले की, भाजपासोबत नाही तर दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र येऊन निवडणुका लढतील. राज्यात जरी अजित पवार भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत असले तरीही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काकांच्या पक्षासोबत आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र येऊन निवडणुका लढण्याच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी अगोदरच स्पष्ट केली की, अजित पवार आणि माझ्यातील काैटुंबिक संबंध कायमच चांगले राहिले आणि ते कधीच दुरावले नाहीत. त्यांच्यात आणि आमच्यात कालही राजकीय मतभेद होते आणि आजही आहेत. सर्वच पक्ष अशाप्रकारची युती करून महापालिका निवडणुका लढत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले. 

...

मोठी बातमी! अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, पुणे महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध, पाण्यापासून ते... - Marathi News | Ajit Pawar and Supriya Sule have released the manifesto of both factions of the Nationalist Congress Party for the Pune Municipal Corporation elections | TV9 Marathi

Pune Municipal Corporation Election : दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र येऊन पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये महापालिक निवडणुका लढवत आहेत. आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
[ETV Bharat]'ओरिजनल बीजेपी आणि बीजेपी 2.0 यात भरपू...
[Navakal]“अजितदादांच्या नेतृत्वावर आजही विश्वास!”;...