1 minute reading time (104 words)

[ABP MAJHA]NEET प्रकरणावर सुप्रिया सुळेंची सरकारवर तोफ; JPC चौकशीची संसदेत मागणी

NEET प्रकरणावर सुप्रिया सुळेंची सरकारवर तोफ; JPC चौकशीची संसदेत मागणी

लोकसभेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी छगन भुजबळ आणि मुरली मनोहर जोशी यांच्या विधानांचा संदर्भ देत संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. जंतरमंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतल्याचे सांगत, आंदोलक विद्यार्थ्यांना परदेशी निधी मिळत असल्याचे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्रातील एका तरुणीने पोलिसांची गाडी अडवल्याचा व्हायरल फोटो आणि आंदोलकांना "50 ग्रॅम पावडर टाकू" अशी धमकी दिल्याच्या आरोपांचाही त्यांनी संसदेत उल्लेख केला. हा विषय UPA विरुद्ध NDA नसून व्यवस्थेविरुद्ध विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आहे, असे त्या म्हणाल्या. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करावी आणि सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

[Saam TV]“२० वर्षांत पहिल्यांदा मी असं वर्तन पाहते...
[Zee 24 Taas]लोकसभेतून सुप्रिया सुळे लाईव्ह