1 minute reading time (99 words)

[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळे LIVE | Supriya Sule

खासदार सुप्रिया सुळे LIVE | Supriya Sule

"महाराष्ट्रातील बळीराजा आज अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांत सापडून होरपळत आहे. शेतकऱ्यांची मागणी प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांच्या मदतीची असताना, सरकारने केवळ 5 हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. 5 हजार रुपयांत आजच्या महागाईत खताचे दोन पोतेही येत नाहीत, मग शेतकऱ्याचा संसार कसा चालणार? जनतेचा विरोध असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे 1 लाख कोटी रुपये उपलब्ध आहेत, मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख रुपयांचे साहाय्य द्यायला तिजोरीत खडखडाट का? सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये," असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. 

[Jai Maharashtra News]सरकारची शेतकऱ्यांना मदत, 5 ह...
[News18 Marathi]सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद लाई...