1 minute reading time (74 words)

[Maharashtra Times]भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

भूषण गवईंच्या समर्थनार्थ मूक आंदोलन; सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार लाइव्ह

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते युगेंद्र पवार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी संविधानाचं रक्षण आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्याचा संदेश देत हातात फलक घेऊन मौन पाळलं.

[ABP MAJHA]शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सुप्र...
[Times Now Marathi]सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा मुद्द...