1 minute reading time (153 words)

[TV9 Marathi]'सुषमा स्वराज मर्यादा पुरुषोत्तम म्हणायच्या आणि आता दौऱ्यावर गेलेले कसे बोलतात पाहा'

'सुषमा स्वराज मर्यादा पुरुषोत्तम म्हणायच्या आणि आता दौऱ्यावर गेलेले कसे बोलतात पाहा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्याबद्दल वक्तव्य केले यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, पार्लमेंटमध्ये चर्चा तेव्हा ही झालेली आहे, यामध्ये नवीन काही नाही. जेपीसी कमिटी केलेली आहे, यात सत्तेतील लोक जास्त असतात. असं पवार साहेबांच्या बोलण्यात आलेलं आहे. आता न्यायालय जे बोललं आहे, त्यावर तरी तुमचा विश्वास आहे की नाही. माझा तर विश्वास आहे. त्यामुळं जेपीसीमध्ये भाजपचे लोक जास्त आहेत. आता न्यायालयातून ते स्पष्ट होईल. एवढंच शरद पवार यांनी म्हटल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तर आम्ही सुरुवातीला पार्लमेंटमध्ये असताना सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांची भाषणे आणि त्यांची मर्यादा पाहून शिकत होतो. सुषमा स्वराज नेहमी श्रीरामाचा उल्लेख करताना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असा करायचा आणि आता दौऱ्यावर गेलेली लोकं कशी बोलतात हे तुम्हीच पहा त्यांना मर्यादा आहेत का हे तुम्हीच ठरवा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केले आहे.

[letsupp]‘त्यांच्या कष्टाला सलाम’
[maharashtratimes]संजय राऊतांच्या झेड प्लस सुरक्षे...