नरहरी झिरवळांना एकटं पाडलंय? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं...
राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून लाच घेताना एका लिपिकास रंगेहात अटक करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने थेट मंत्रालयात छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होक आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील 35 हजार रुपये स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. तर या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणावर टीका होत असून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली होती, त्यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

