1 minute reading time (83 words)

[NDTV Marathi]कराडविरोधात FIR मग कारवाई का नाही? सुळेंचा सवाल; लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार?

कराडविरोधात FIR मग कारवाई का नाही? सुळेंचा सवाल; लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार?

 महाराष्ट्रात सध्या बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआडी पोलिसांकडे शरणागती पत्करली. मात्र, त्यावरूनही पोलिसांवर टीका करण्यात येत असताना आता वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे असल्याची टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडेंच्याच बंगल्यावर खंडणीसंदर्भातली बोलणी झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे. या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

[Saamana]राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार पर...
[Lokshahi Marathi]सरकारने संवेदनशीलपणा दाखवावा, बी...