1 minute reading time (128 words)

[News State Maharashtra Goa]महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी काढली शरद पवारांची आठवण

महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी काढली शरद पवारांची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु असतानाच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार यांनी सर्वप्रथम पंचायत राज निवडणुकीत महिला आरक्षण लागू केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अमित शहा बोलले पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येक बहीण इतकी नशीबवान नसते. महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील उल्लेख केला. आज महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे पण महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्ष यांनी मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला होता. यावर भाजपने उत्तर द्यायला हवे. भाजपचे लोक वैयक्तिक महिलांवर टीका करतात, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

[ABP MAJHA]महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री आरक्षणा...
[maharashtratimes]"प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नस...