वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा द्यावा

खा. सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी दिल्ली, दि. ९ (प्रतिनिधी) - मुंबईहून सोलापूर साठी उद्यापासून (दि. १०) सोडण्यात येणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे याबाबत मागणी करत दौंड हे किती महत्वाचे जंक्शन आहे, हे नि...

Read More
  615 Hits

वयोश्री, ADIP योजनेसाठी खा. सुळे यांनी आंदोलनांनातर घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ADIP आणि वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पुण्यात आंदोलन केल्यानंतर लागलीच खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांच्याकडे मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री...

Read More
  618 Hits

नीरा-बारामती मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

 केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्याकडे दिले पत्र पुणे, दि. २ (प्रतिनिधी) - बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आह...

Read More
  602 Hits

दौंड तालुक्यातील रेल्वे मार्गखालील मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करून लोकांना रस्ते द्या

खासदार सुळे यांच्या रेल्वे खात्याला सूचना पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील रेल्वे लाईनच्या खालून गेलेल्या चार ठिकाणच्या मोऱ्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्याचवेळी काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्याचे गेट सुद्धा बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांची कामे खोळंबुन पडत आहेत.ते काम तातडीने पूर्ण करावे. याशिवाय दोन ठिकाणी लवकरच उड्डाणप...

Read More
  595 Hits

प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

बारामती-मुंबई थेट रेल्वेसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे खात्याला दिला पर्याय  पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभा...

Read More
  537 Hits

जेजुरी रेल्वेस्थानकासमोरील खुल्या ड्रेनेज लाईनमुळे रोगराई आणि अपघाताचा धोका

खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली भीती पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - जेजुरी रेल्वे स्टेशन समोर रेल्वे प्रशासनामार्फत ड्रेनेजचे काम सुरु आहे. ही ड्रेनेज लाइन १० फुट खोल व पुढे १५ ते २० फुटापर्यंत खोल होणार असून ते खुले राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास याठिकाणी असलेल्या लोकवस्तीत आणि स्टेशनवर येणाऱ्या भक्तांमध्ये रोगराई पसरण्याबरोबरच ...

Read More
  528 Hits

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू - खा. सुळे

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका  पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्हाला  आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच...

Read More
  661 Hits

बारामतीमध्ये कामगारांसाठी शंभर बेडच्या इएसआयसी रुग्णालयाला केंद्राची मंजुरी

खासदार सुळे यांच्याकडून आभार मानतानाच आणखी शंभर बेड वाढवण्याची मागणी  बारामती, दि. २८ (प्रतिनिधी) - बारामती येथे केंद्र सरकराने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. यासाठी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव या...

Read More
  696 Hits

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,पुणे, दि. २३, (प्रतिनिधी) - कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण ...

Read More
  581 Hits

वरवंड येथे पोलीस मदत केंद्र सुरू

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला तत्काळ यश दौंड, दि. १७ (प्रतिनिधी) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत जिल्हा पोलिसांनी दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस मदत केंद्र सुरू केले आहे. खासदार सुळे यांनी नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक गोयल यांच्याकडे याबाबत पत्र पाठवून मागणी केली होती. त्यानुसार पोलीस मदत केंद्र सुरू झाले असून स...

Read More
  717 Hits

चाळिसाव्या वर्षी एमपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिकाचे खा. सुळे यांच्याकडून कौतुक

लष्करात सतरा वर्षे सेवा करून आता जनतेची सेवा करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याचा गौरव दौंड, दि. १७ (प्रतिनिधी) - भारतीय लष्करात सतरा वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. पास होऊन सध्या परिवहन खात्यात अधिकारी झालेल्या दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिकाला भेटून खासदार ...

Read More
  576 Hits

इंदापुरात भीमेकाठी भरतपूर अभयारण्याप्रमाणे पक्षीनिरीक्षण केंद्र विकसित करावे

खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य शासनाकडे पत्राद्वारे मागणी इंदापूर, दि. १७ (प्रतिनिधी) - राजस्थानातील भरतपूर पक्षी अभयरण्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव आणि तक्रारवाडी येथे भीमेच्या काठी शासन पुरस्कृत पक्षीनिरीक्षण केंद्र करता येऊ शकते. तरी इंदापूर तालुक्यात भीमा नदीच्या परिसरातील पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रिसॉर्ट ...

Read More
  552 Hits

फुरसुंगी कचरा डेपो समस्या पुन्हा डोके वर काढतेय; तातडीने उपाययोजनांची गरज

पुलावरील वाहतूक कोंडी कमी झाल्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले समाधान  पुणे, दि. १६ (प्रतिनिधी) - पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावरील फुरसुंगी येथील पुलावरील वाहतूक कोंडी तुलनेने बरीच कमी झाली याचा आनंद आहे. तथापि या भागातील कचरा डेपोमधून पुन्हा एकदा दुर्गंधी येऊ लागली आहे. याशिवाय कचरा जाळण्याचे प्रकार सुरू झाले असून परिसरात धुराचे ...

Read More
  656 Hits

दौंड तालुक्यातील वरवंड येथे पोलीस चौकी स्थापित करावी

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी  दौंड, दि. १४ (प्रतिनिधी) - दौंड तालुक्यातील वरवंड हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. तसेच येथे पाटस, कुसेगाव, रोटी, पडवी, देऊळगाव, कानगाव, हातवळण, भांडगाव, कडेठाण व कुरकुंभ परिसरातील विद्यार्थी आणि नागरीक येत असतात. या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता वरवंड येथे पोलीस चौकीची गरज आहे, तरी लवकरात लवकर याठिकाणी चौक...

Read More
  618 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने वारजे भागात उद्या रिंगण भजन सोहळ्याचे आयोजन

खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती पुणे, दि. १४ (प्रतिनिधी) - नव्या पिढीला वारकरी संगीताचा परिचय करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने उद्या (दि.१५) 'संतविचारांचा सुरेल आविष्कार ' हा रिंगण भजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वारजे येथील अतुल नगर भागात अविस्मरा सेलिब्रेशन्स, चितळे बंधू मिठाईवाले शेजारी येथे उद्या दुपारी साडेचार वाजता ...

Read More
  778 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्तीने डीएसके विश्व-मेघमल्हार सोसायटीचा पाणी प्रश्न सुटणार

महापालिका आयुक्तांनी बैठकीत दिले उपाययोजनेचे आश्वासन पुणे, दि. ११ (प्रतिनिधी) - धायरी परिसरातील डीएसके विश्वमधील मेघमल्हार सोसायटीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधि...

Read More
  604 Hits

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सिंहगडावर उद्या स्वच्छता अभियान

पुणे, दि. ७ (प्रतिनिधी) - खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. ८) सकाळी 'आपला सिंहगड आपला अभिमान' अंतर्गत किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान घेण्यात येणार आहे. सकाळी साधारण साडेसहाच्या सुमारास सुप्रिया सुळे या अभियानात सहभागी होणार असून जास्तीत जास्त गडप्रेमींनी याभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नरवीर सरदार तान्...

Read More
  639 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे खानवडी येथे मंगळवारी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

पुरंदर, दि. ३१ (प्रतिनिधी) - महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मासूम या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी येत्या मंगळवारीआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हे आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. महिलां...

Read More
  736 Hits

नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी सर्व संबंधीत संस्थांची एकत्रित बैठक बोलवा

खा. सुळे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) - पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परीसरात सातत्याने अपघात घडत आहेत. हा परिसर कायमचा अपघातमुक्त करण्यासाठी याठिकाणी काही सुधारणा करणे गरजेचे आहे. या रस्त्याशी एनएचएआय, पुणे महापालिका, एमएसईबी, एमएनजीएल आणि पीएमआरडीए अशा एकापेक्षा जास्त संस्था सहभागी आहेत. या स...

Read More
  564 Hits

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा

विवाहेच्छूक दिव्यांग तरुण तरुणींना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन पुणे, दि.१९ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला हो...

Read More
  617 Hits