राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "ते म्हणत आहेत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. ८४ दिवस त्यांना नैतिकता सुचली नाही. सुरेश धस म्हणतात ते खरेच आहे, नैतिकता आणि यांची कधी गाठचं झाली नाही. धनंजय मुंडे आणि नैतिकता कधी भेटलेच नाहीत."