By Editor on Saturday, 16 August 2025
Category: महाराष्ट्र

[TV9 Marathi]तंत्रज्ञानाच्या जगात लाडकी बहिणसारख्या योजनेत घोळ होतात'

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या . महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होत आहे .राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावरून सरकारला फटकारलंय. लाडकी बहीण योजनेत 4800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आराेप खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

Leave Comments