By Editor on Thursday, 12 March 2026
Category: Press Note

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिराचे आयोजन

बारामती : यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप व सिकोर एड्स प्रा.लि. संयुक्त विद्यमाने बारामती येथे कर्णबधीर मुलांसाठी श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा एकूण १५४ जणांनी लाभ घेतला. तसेच, ३०८ श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.

चव्हाण सेंटरच्या आरोग्य व ज्येष्ठ नागरिक विभागातर्फे कर्णबधीर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यभर कर्ण तपासणी आणि श्रवणयंत्र वाटप उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार, बारामती येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे, ॲड.राजेंद्रबापू जगताप, वनिताताई बनकर, नगरसेविका आरती शेंडगे-गव्हाळे, गणपत आबा देवकाते, ॲड.बळवंत बेलदार पाटील, प्रियांका शेंडकर यांच्यासह पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना श्रवणयंत्र बसविण्यात आले आणि नंतर सर्व लाभार्थ्यांना ते वाटप करण्यात आले.
Leave Comments