[TV9 Marathi]पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अस आश्वासन दिलं होत त्याच काय झालं?
"महाराष्ट्रातील अनेक सामाजाची आरक्षणाबाबत ट्रिपल इंजिनच्या सरकारनं फसवणूक केली. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला पहिल्यांदा आरक्षण देऊ, अशा पद्धतीने घोषणा केली. गेल्या दहा वर्षापासून यांचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संसदेत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आवाज उठवला आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम आणि भटक्या विमुक्त समाजाला पूर्णपणे भाजपानं आणि त्यांच्या मित्र पक्षांनी फसवलं," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. निवडणुका आल्या की आरक्षणाचा शब्द देतात आणि सत्तेत बसले की आरक्षणावर चर्चा करत नाही. महाराष्ट्रात एक बोलतात, दिल्लीत एक बोलतात." महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीची तयारी सुरु असून ती सरकार पुरस्कृत आहे, का यावर बोलताना सुळे म्हणल्या की, "एकदा आघाडी होऊ द्या नंतर बघू या कोणकोणत्या आघाडीत कोण आहे, त्यावर आधीच कशाला बोलायचं."

