1 minute reading time
(74 words)
[Jai Maharashtra News]येत्या सोमवारीआम्ही पंतप्रधान यांची दिल्लीत खासदारांसोबत एकत्र भेट घेणार आहोत
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली की, त्यांच्यासह पक्षाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (10 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता भेट घेणार आहेत. राज्यातील अनेक प्रश्नांबाबत या भेटीवेळी चर्चा होणार असल्याची माहिती दिली. तसेच परदेशी अंशदान (नियमन) कायदा (FCRA) या बिलाला आमचा विरोध असून ते बिल जॉईंट पार्लमेंटरी समितीकडे (JPC) पाठवावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

