1 minute reading time (117 words)

[ABP MAJHA]वर्दीची भीती राहिलेलीच नाही, असंवेधनशील सरकार;भर पावसात सुप्रिया सुळेंचं भाषण

वर्दीची भीती राहिलेलीच नाही, असंवेधनशील सरकार;भर पावसात सुप्रिया सुळेंचं भाषण

 शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केले. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलने केली जातील, असेही स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरुन गेला आहे. याच घटनांच्या निषेधार्थ ही आंदोलने केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज पुणे स्थानकाबाहेर शरद पवार यांच्या नेतृत्वात मविआच्या (MVA) कार्यकर्त्यांनी तोंडावर काळा मास्क लावून निषेध आंदोलन केले. यावेळी खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) परखड शब्दांत टीका केली.

[Saam TV]भर पावसात मविआचं आंदोलन! Supriya Sule काय...
[Zee 24 Taas]पुण्यातील मविआ निषेध आंदोलनातून सुप्र...