1 minute reading time
(92 words)
[Saam TV]महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या राज्याला देऊ नये, सुळेंची सरकारकडून अपेक्षा
आचारसंहिता काळात योजनांचा लाभ देता येत नसल्याने निवडणूक संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता निवडणूक आटोपली असल्याने हप्त्याबाबत बहिणींमध्ये उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना महत्त्वपूर्ण ठरल्याने, महायुती सरकार विक्रमी मताधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे.आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा असून तो खात्यात कधी जमा होणार, याची चर्चा आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून सुरू केलेल्या या योजनेंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत शेकडो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेस पात्र ठरल्या आहेत.

