1 minute reading time
(100 words)
[Lokshahi Marathi]देश-राज्यासमोर मोठी आव्हानं, सरकारने आत्मचिंतन करावं- सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी डीजेच्या मुद्द्यावर भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, वाद खुपच टोकाला गेला आहे. सरकारला विनंती आहे, सर्वांना एकत्र बोलवुन मार्ग काढणे गरजेच आहे. शिक्षणाच्या माहेरघरात खाकिची भीती राहिली नाही. अजून आपले मुख्य सण येणे बाकी आहेत. यादरम्यान त्यांनी नागपूरचे उदाहरण देखील दिले. भंडारे प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, किती दुर्दैवी आहे. फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आपला. काय चालले आहे राज्यात. सरकारने लक्ष घातले पाहिजे. काकडेंवर बोलताना सुळे यांनी म्हटले की, नाचण्याचा विरोध नाही. सुप्रिम कोर्ट काय सांगते, नियम कायद्यात. नागपुरात कायदा चालु शकतो तर राज्यात का नाही?

