3 minutes reading time (537 words)

[Navarashtra]लाडकी बहिण योजनेतील एका बहिणीचे पैसे घेऊन दाखवा मग बघा…

लाडकी बहिण योजनेतील एका बहिणीचे पैसे घेऊन दाखवा मग बघा…;

सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

महायुतीच्या दोन आमदारांनी विधानसभा निवडणुकीत मते न मिळाल्यास लाडकी बहिण योजनेचे पैसे परत घेण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्याला खासादर सुप्रिया सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर सगळ्या काय एकाच बहिणीचे पैसे घेऊन दाखवा, मग बघा पुढे काय होते. मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, " आमच्याकडे भावांची कमतरता नाही. पण आमचे दोन वीर बंधू परवा भाषणात म्हणाले, आमचं लक्ष आहे कोणती बहिण कुठे मतदान करते. एकजण नाही तर दोघे दोघे म्हणाले. म्हणजे कधीतरी पोटातलं ओठावर येतंच. सत्य कधीच लपत नाही. ते दोघे म्हणाले, काळजी करू नका आमचं लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही कुठे मतदान करता. पण ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतरही मीही तुमचाच भाऊ आहे, जसे दहा हजार रुपये दिले. तसे परत घ्यायची ताकदही माझ्यात आहे. म्हणजे यांचे कोणतेही नाते प्रेमाचे नाही तर मतांशी जोडलेले नाते आहे. पण माझं त्यांना म्हणण आहे की, तुम्ही एकाच बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवा, मग बघा… अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या आमदार रवी राणा आणि महेश शिंदे यांना इशाराच दिला आहे.

याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. "लोकसभेपर्यंत कोणालाच बहिणी आठवल्या नाहीत पण निकालानंतरच त्यांना बहिणी आठवायला लागल्या. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, बहिणीचं नात हे आमच्या भावांना कधी कळलचं नाही आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसाय यात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसते. ते म्हणतात. एक बहिण गेली तर दुसऱ्या बहिणी आणू पण 1500 रुपयात बहिण मिळेल एवढं हे नातं बिकाऊ नाही. तुम्ही आमच्या नात्याचा अपमान केला. बहिणभावाचं नात इतक निरागस असते. पण त्याला किंमत लावायेच पाप महाराष्ट्र सरकारने केलं, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा पत्रकार मला विचारतात, दिल्लीत हवा कशी आहे. यावर मी सांगते. दिल्ली मे हवा बदल चुकी है, कारण आम्ही विरोधक असलो तरी आम्ही असे वागतो, जसे आम्हीच सत्तेत आहोत. पण शपथ घेऊन जे सत्तेत बसलेत ते हारून मंत्री झाले, असे बसलेले दिसतात.

दिल्लीचे वातावरण बदलले आहे. आता आपल्याला महाराष्ट्रातले वातावरण बदलायचे आहे. ही आपली जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी जागावाटप आणि पुढे कसे जायचे याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. सर्वाच्या यात्रा सुरू झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकसभेच्या निवडणुकीत मी आणि अमोल दादा (खासदार अमोल कोल्हे) आम्ही निवडून आलो. सगळ्या भगिणींमध्ये सर्वात जास्त माझ्यावर प्रेम असल्यामुळे माझ्याकडे सर्वांचच जास्त लक्ष होते. पण लोकसभेत ज्या पद्धतीने मतदान झाले. म्हणजे आमचे, खासदार, आमदार, कारखाने, साखर कारखाने, दुधसंघ, सोसायटी, ग्रामपंचायत सर्व काही गेले होते. काहीच राहिले नव्हते. पण तरीही आम्ही प्रचार केला. पण या संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि कांग्रेस ज्या पद्धतीने आमच्यासोबत उभा राहिला ते आम्ही कधीही विसरणार नाहीत.

आता संपूर्ण 31 खासदारांच्या वतीने मी शब्द देते की, ज्या पद्धतीने तुम्ही कष्टांची परिकाष्ठा केली त्यापेक्षा जास्त कष्ट करू आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणू असा मी आपल्याला शब्द देते. एकमेकांचा प्रचार करू, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी विधानसभा निवडणुकीची ग्वाही दिली.

...

लाडकी बहिण योजनेतील एका बहिणीचे पैसे घेऊन दाखवा मग बघा…; सुप्रिया सुळेंचा थेट इशारा- Marathi News - Navarashtra

जेव्हा पत्रकार मला विचारतात, दिल्लीत हवा कशी आहे. यावर मी सांगते. दिल्ली मे हवा बदल चुकी है, कारण आम्ही विरोधक असलो तरी आम्ही असे वागतो, जसे आम्हीच सत्तेत आहोत. पण शपथ घेऊन जे सत्तेत बसलेत ते हारून मंत्री झाले, असे बसलेले दिसतात.  
[TV9 Marathi]1500 रुपयांना नातं विकलं जात नाही हो…
[News State Maharashtra Goa]बहिणींचं नातं आमच्या भ...