1 minute reading time (122 words)

[Jai Maharashtra News]Supriya Sule यांचं महागाईविरोधात आंदोलन; 'महागाई कमी झालीच पाहिजे', सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule यांचं महागाईविरोधात आंदोलन; 'महागाई कमी झालीच पाहिजे', सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महागाईविरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. तेल, डाळी, दूध, साखर, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंपासून ते रिक्षा आणि टॅक्सीच्या दरांपर्यंत सर्वकाही महागल्याने सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, "सध्या काहीच स्वस्त राहिलेले नाही. दुकानात गेल्यावर वस्तूंच्या किमती पाहून धक्का बसतो." गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीसारखे सण तोंडावर असताना सरकारने प्रचंड महागाई वाढवून कर भरणार्‍या कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप केले आहे, असे त्या म्हणाल्या. सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंवर कोणतीही सबसिडी दिली जात नसून, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य, कष्टकरी, शोषित आणि वंचित घटकांना जगणे मुश्कील झाले आहे. महागाई कमी झालीच पाहिजे, ही आपली आग्रहाची भूमिका असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 

[TV9 Marathi]भाऊ माझा गेला, 40 आमदारांनी, 9 मंत्र्...
[TV9 Marathi]'माझ्या भावाचा FIR होत नाही; पण Amit ...