1 minute reading time (114 words)

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादाचाही त्यांनी उल्लेख केला. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असून, राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच आहे. पक्षाच्या अंतर्गत नियमांनुसार आमदार-खासदारांची संख्या ही पक्षाच्या मालकीचा एकमेव आधार ठरू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसवरील आपला दावा योग्य असल्याचं सांगत या संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयात सादर केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, या प्रकरणात निवडणूक आयोगाने शरद पवार गटावर अन्याय केल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. घटनात्मक संस्थांवर टीका करणं आपल्याला आवडत नाही, मात्र परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं भाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 

[TV9 Marathi]राष्ट्रवादी कालही, आजही आणि उद्याही श...
[Mumbai Tak]परदेशी निधीवर भाष्य, मुंबईतून सुळेंची ...