1 minute reading time
(85 words)
[TV9 Marathi]उद्याचा दिवस बदलयाची ताकद समरजित घाटगे यांच्याकडे- सुप्रिया सुळे
लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कमिटीसाठी नाव जाहीर केले की, तो माणूस दुसऱ्या दिवशी तिकडे ( अजित पवार गटात) जायचा. त्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की, अनेक ठिकाणी बूथ कमिटीसाठी माणसे नव्हती, असे सुप्रिया सुळे चिंचवडमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या. यावेळी त्यांनी सहा दशकांपासून ज्यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते, त्या घरी गेले तेव्हा त्यांनी तोंडावर दरवाजा बंद केला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली. समरजितसिंह घाटगे यांनी कागल मतदारसंघातील पुणे-चिंचवडमध्ये असलेल्या मतदारांना समोर ठेवून कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केला होता. चिंचवडे लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी हा प्रसंग सांगितला.

