1 minute reading time (248 words)

[Political Maharashtra]सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

सुनेत्रांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सुळे म्हणाल्या, “बारामतीला जर…”

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला काल रविवारपासून सुरुवात झाली. बारामतीच्या कन्हेरी येथे पवार यांची सभा पार पडली. या सभेत पक्षाचे आणि महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते. या प्रचारसभेत राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख केला, त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उंमटत आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधानाचे स्वागत करत, या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

आदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आता खासदार सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या, "आदिती तटकरेंनी व्यक्त केलेली भावना अतिशय सुंदर आहे, मी त्याचं मनापासून स्वागत करते. बारामतीतून शरद पवार हे चार वेळा मुखयमंत्री झाले. बारामती मतदारसंघाचा एक मान आहे. अजितदादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाला. तर त्याच बारामती मतदारसंघाला पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपदाचा मान मिळत असेल, तर अर्थातच आनंद आणि स्वागतच आहे."

आदिती तटकरे काय म्हणाल्या होत्या?

"अजितदादा सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले. मात्र आता दादा आपल्यात नसताना, त्यांच्यानंतर सुनेत्रा वहिनी यांना मुख्यंमंत्री म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. भविष्यात सुनेत्रा वाहिनी यांनी दादांनी पाहिलेलं मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पुर्ण करावं," अशी भावना तटकरे यांनी व्यक्त केली होती. 

...

खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत जावेसे का वाटले नाही? व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्व अपयशी ठरल्याची सुप्रिया सुळे यांची खंत - Civic Mirror

मुंबई - भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे जावेसे का वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून आणि व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी
[TV9 Marathi]'हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाह...
[Saamana]खरातकडून शोषण होणाऱ्या कुठल्याही महिलेला ...