1 minute reading time (241 words)

[Times Now News]खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात

 खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात

 Supriya Sule Car rammed by another vehicle on Mumbai Pune Highway: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. एका बेजबाबदार चालकाने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिली. सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून सर्वजण सुरक्षित आहेत.

नेमकी घटना काय?

खासदार सुप्रिया सुळे या शनिवारी (9 मे 2026) पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना, GJ13CF5257 या क्रमांकाच्या वाहनाने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे आणि अतिवेगामुळे हा अपघात घडला. या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आणि अपघाताचा भीषण अनुभव शेअर केला.

महामार्गावरील वाढती असुरक्षितता

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आणि महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडलेली ही घटना महामार्गावरील शिस्त आणि वेगाच्या मर्यादेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षिततेची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, सोशल मीडियावर त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून संबंधित वाहनचालकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

...

Supriya Sule Car Accident: खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात | Times Now Marathi

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. स्वत: सुप्रिया सुळे यांनी या अपघाताची माहिती दिली आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi
[Deshdoot]माझ्या सुरक्षेसाठी दिलेली पोलीस सुरक्षा ...
[ETV Bharat]कर्मवीर पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला, पण...