1 minute reading time (86 words)

[Saam TV]भर पावसात मविआचं आंदोलन! Supriya Sule काय म्हणाल्या?

भर पावसात मविआचं आंदोलन! Supriya Sule काय म्हणाल्या?

 बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार आणि राज्यात झालेले मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने निषेध आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वत: शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला. ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे सुप्रिय सुळे यांनी सांगितले.

[TV9 Marathi]राज्यातील सरकार प्रत्येक गोष्टीत राजक...
[ABP MAJHA]वर्दीची भीती राहिलेलीच नाही, असंवेधनशील...