1 minute reading time (145 words)

[ABP MAJHA]Majha Maharashtra Majha Vision LIVE | Supriya Sule LIVE | NCP | ABP Majha LIVE

Majha Maharashtra Majha Vision LIVE | Supriya Sule LIVE | NCP | ABP Majha LIVE

 बारामती पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. जय पवार (Jay Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 2029 मध्ये मी उमेदवार व्हावे, अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे. पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बारामतीत भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत आम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. पण आमचे पक्ष वेगळे आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे 2029 साली बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आता यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय. आपल्या महाराष्ट्राचा यंदा 67 वा वर्धापन दिन असून यानिमित्त एबीपी माझानं आज माझा व्हिजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.

[ETV Bharat]खासदार सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक को...
[Bhramar]"महिला आरक्षणावरून राजकारण तापले: सुळे-फड...