1 minute reading time (67 words)

[ABP MAJHA]महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीनं 288 जागांवर लढणार : सुप्रिया सुळे

महाविकास आघाडी म्हणून पूर्ण ताकदीनं 288 जागांवर लढणार : सुप्रिया सुळे

बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. महाविकास आघाडी म्हणून आम्ही 288 जागा लढवणार आहोत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. प्रत्येकजण कुणाला तिकीट द्यायचे कुणाला नाही? याचा निर्णय सर्व्हे, चर्चा करून घेतील. तसेच लोकांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांचा मानसन्मान म्हणून आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[ABP MAJHA]परमबीर बोलतात हे राजकीय षडयंत्र, परमबीर...
[Lokshahi]कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगी...