1 minute reading time
(92 words)
[TV9 Marathi]अजितदादांच्या आजारपणासंदर्भात मी सुनेत्रा पवारांना मेसेज केला'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे (बुधवार) सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजारी असल्यामुळे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली. मंगळवारी मुंबईतील वरळी डोम इथं पार पडलेल्या बैठकीलादेखील ते अनुपस्थित होते. कालची बैठकसुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या नेतृत्वात पार पडली. अजित पवारांच्या आजारपणासंदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना मेसेज केला आहे. खुद्द सुप्रिया सुळेंनीच याबद्दलची माहिती दिली. 'गेट वेल सून' असं लिहित त्यांनी अजित पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु सुनेत्रा पवारांचा मला अद्याप मेसेज आला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

