2 minutes reading time (354 words)

[TV9 Marathi]भाऊ माझा गेला, 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी अद्याप शब्द काढला नाही

भाऊ माझा गेला, 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी अद्याप शब्द काढला नाही

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या अजूनही गुन्हा…

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यावर बोलताना सत्ताधारी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या. अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे खासदार झाले. आता सध्या राष्ट्रवादी सत्तेत असून अनेक महत्त्वाचे नेते सत्तेत मंत्री आहेत. दुसरीकडे अजितदादा यांच्या विमान अपघाताची चौकशी चालू असून याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. याच बाबीचा उल्लेख करून सुप्रिया सुळे यांनी खदखद व्यक्त केलीय. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे टीकाच केली आहे.

अमित ठाकरेंविषयी विचारण्यात आला प्रश्नसुप्रिया सुळे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना मनेसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावर भाष्य करताना, एक फोटो हटवला तर गुन्हा दाखल झाला. उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?अजित पवार यांचे निधन आणि त्यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर भाष्य केले. माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. सत्तेत असणाऱ्या, उपमुख्यमंत्री असणाऱ्या अपघात झाला. याबाबत अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेचा भाग आहे की नाही? अजित पवार गटाच्या 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी कधीतरी एफआयआर किंवा चौकशीवर एक शब्दही काढलेला नाही, अशी खदखद सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

भावाच्या विमान अपघाताच्या तपासाची काय स्थिती?तसेच, मनसे आणि भाजपाने लढायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. अमित ठाकरेंवर दोन तासांत गुन्हा दाखल झाला. पण दुसरीकडे माझ्या भावाच्या विमान अपघाताच्या तपासाची काय स्थिती आहे, हे अजूनही आम्हाला माहिती नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. यावर आता सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातर्फे काय प्रतिक्रिया दिली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

...

भाऊ माझा गेला, 40 आमदारांनी, 9 मंत्र्यांनी अद्याप शब्द काढला नाही, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या अजूनही गुन्हा... - Marathi News | Supriya sule comment on ajit pawar plane crash said government did not file fir till now | TV9 Marathi

अजित पवार यांचे निधन आणि त्यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर भाष्य केले. माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. सत्तेत असणाऱ्या, उपमुख्यमंत्री असणाऱ्या अपघात झाला.
[Sarkarnama]अजितदादांच्या विमान अपघातावरून सुप्रिय...
[Jai Maharashtra News]Supriya Sule यांचं महागाईविर...