1 minute reading time (90 words)

[Saam TV]“हा प्रश्न मला नाही, मुख्यमंत्र्यांना विचारा!” सुळेंनी जोडले हात!

“हा प्रश्न मला नाही, मुख्यमंत्र्यांना विचारा!” सुळेंनी जोडले हात!

खासदार सुप्रिया सुळे यांनी UNCUT संवादात MPSC परीक्षा, पेपरफुटी, दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांवरून राज्य सरकारला घेरलं. MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर असून, परीक्षा व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरफुटी रोखली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. एका महिला MPSC परीक्षार्थीने रात्री फोन करून आत्महत्येचा उल्लेख केल्याचा प्रसंगही सुप्रिया सुळे यांनी सांगितला. विद्यार्थ्यांची चूक नसून यंत्रणा आणि सरकारची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं. दुष्काळाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अजित पवारांच्या मृत्यूच्या विषयावर यापुढे आपण बोलणार नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. 

[TV9 Marathi]‘मी या विषयावर बोललेलं लोकांना आवडत न...
[Lokshahi Marathi]'जगामध्ये अनेक परीक्षा होतात, आप...