1 minute reading time
(102 words)
[ABP MAJHA]EVM विरोधात जनतेत असंतोष, बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला, तीन प्रमुख घटक पक्ष मिळून राज्यात महाविकास आघाडीच्या केवळ 50 च जागा आल्या तर दुसरीकडे महायुतीला मात्र मोठ यश मिळालं. राज्यात महायुतीच्या तब्बल 231 जागा आल्या. या निवडणूक निकालानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. जर एकदा निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या तर काय अडचण आहे. शरद पवार आणि जयंत पाटील हे मार्कडवाडीला जाणार आहेत. एखाद्या गावात एखादी अॅक्टिव्हिटी होत असेल तर सरकारला काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे,

