1 minute reading time
(76 words)
[Maharashtra Times ]तेढ निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांचं मोठं योगदान, राज्याचं नुकसान
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी भाजप आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढलेली आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत त्यामुळे राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलं आहे. समाजात तेढ निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांचं मोठं योगदान, महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलंय, असंही म्हणाल्या.

