2 minutes reading time (371 words)

[Aapla Mahanagar]सरकारचे हाताची घडी आणि तोंडावर बोट; दरवाढीप्रकरणी सुप्रिया सुळेंचा संताप

सरकारचे हाताची घडी आणि तोंडावर बोट; दरवाढीप्रकरणी सुप्रिया सुळेंचा संताप

मुंबई : आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, गृहिणी आणि मध्यमवर्गीय आधीच महागाईने होरपळून निघाले आहेत. अशातच 1 सप्टेंबर उजाडताच सरकारने विविध घटकांमधील दरवाढ लागू करून जनतेवर आणखी एक प्रहार केला आहे. आजपासून मुंबई आणि परिसरात सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढून 88 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर घरगुती स्वयंपाकाचा गॅस देखील महाग झाला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय आणि खानावळींचे दर वाढून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

इंधन दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि ट्रान्सपोर्टचे भाडे वाढले आहे. तसेच दररोज लागणाऱ्या दूधाच्या दरात वाढ झाल्याने नागरीकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. महत्वाचे म्हणजे साखरेच्या दरातही मोठी वाढ झालेली असून ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे दर अचानक वाढणे हे संशयास्पद असून यातून केवळ सर्वसामान्य जनतेची लूटच होत आहे. गुळ, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. दुर्दैवाने सरकारने आपल्या माध्यमातून यावर अंकुश ठेवणे आवश्यक असताना ते केवळ हाताची घडी, तोंडावर बोट या भूमिकेत आहे.

तथाकथित 'अच्छे दिन'चा नारा देणारे सरकार रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी का ठरत आहे? इंधनावरील सेस आणि इतर कर कमी करून जनतेला दिलासा का दिला जात नाही? निवडणुका संपल्या की महागाई वाढवायची ही सरकारची सवय आहे का? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत, अशी मागणी करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महागाई तातडीने नियंत्रणात आणणे सरकारला सहज शक्य आहे, पण त्यासाठी तशी इच्छाशक्ती हवी आहे. सरकारने ती दाखवावी ही आमची मागणी आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने प्राधान्याने काम करावे, इंधनावरील कर कमी करावेत आणि सर्वसामान्य जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

...

सरकारचे हाताची घडी आणि तोंडावर बोट; दरवाढीप्रकरणी सुप्रिया सुळेंचा संताप

मुंबई : आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी …
[Lokmat]पुण्यातील डीजेबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट...
[Maharashtra Times]जिलेबीसारखी गोलगोल भूमिका नको; ...